शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप

मुंबई पोलिसांनी मंगळवारी कांदिवलीमधील शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप
SHARES

मुंबई पोलिसांनी मंगळवारी कांदिवलीमधील शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचाही समावेश आहे. या पाच जणांनी पोईसर इथं एका डिलेव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोनजण अद्याप फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे. डिलेव्हरी बॉयच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

“समतानगर पोलीस स्थानकामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली पूर्व इथल्या जय हिंद चाळीमध्ये राहणाऱ्या राहुल शर्मानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका ई कॉमर्स साइटसाठी आपण काम करतो असं शर्माने सांगितलं आहे.

मंगळवारी हा तरुण पोईसरमध्ये डिलेव्हरीसाठी गेला असता जोरदार पाऊस पडू लागला. त्यावेळी त्यानं पोईसरमधील शिवाजी मैदान इथं असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालायसमोरील छपराखाली आसरा घेतला,” असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा शिवसेना कार्यालयाच्या बाहेरील बाजूस उभा असतानाच शिवसेना कार्यकर्ता असणाऱ्या चंद्रकांत निनवे यांनी शर्माकडे असणाऱ्या पार्सवर पाय ठेवला. “शर्मानं निनवे यांना त्या वस्तूंना पाय लावू नका, असं सांगितलं असता त्यांनी शर्माला शिवागाळ करण्यास सुरुवात केली. या शाब्दिक बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि निनवे यांनी अन्य पाच शिवसैनिकांच्या मदतीनं शर्माला मारहाण केली,” अशी माहिती पोलीसांनी दिलीय.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कलमांअंतर्गत शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. “या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.



हेही वाचा

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा