Advertisement

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या

डेल्टा प्लसच्या चाचण्या सरसकट होणार नसून निवडक होणार आहेत. दिवसाला २०० ते ३०० चाचण्या करता येऊ शकतील.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे, मात्र, डेल्टा प्लस या कोरोनाच्या बदलत्या रुपाचा धोका निर्माण झाला आहे. डेल्टा प्लसचा धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने अमेरिकेहून मागवलेले साडेसहा कोटी रुपयांचं मशीन पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालं आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबामध्ये डेल्टा प्लसच्या चाचण्या सुरू होणार आहेत. 

मुंबईत आतापर्यंत डेल्टा प्लसचे ६०० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र,  डेल्टा प्लसचा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरादेखील झाला आहे. पालिकेच्या मुलुंड येथील कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरला दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाला आहे. तिच्या स्वॅब सॅम्पलची चाचणीही या डेल्टा प्लस मशीनमध्ये केली जाणार आहे. या मशीनमुळे कोरोनाचा कोणता म्युटंट आहे याचे निदान होऊन कमी वेळेत योग्य आणि अधिक उपचार केले जाऊ शकणार आहेत . 

सध्या ही चाचणी पुण्याला होत आहे. तिचा अहवाल यायला दोन महिने लागतात. पण या मशीनमुळे चार दिवसांत अहवाल मिळणार आहे. डेल्टा प्लसच्या चाचण्या सरसकट होणार नसून निवडक होणार आहेत. दिवसाला २०० ते ३०० चाचण्या करता येऊ शकतील. एका चाचणीसाठी १० ते १२ हजार रुपये खर्च येणार आहे. मुंबई महापालिका या चाचण्या मोफतच करणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा