पुन्हा झाला मुंबईतल्या एटीएममध्ये खडखडाट

Dadar
पुन्हा झाला मुंबईतल्या एटीएममध्ये खडखडाट
पुन्हा झाला मुंबईतल्या एटीएममध्ये खडखडाट
पुन्हा झाला मुंबईतल्या एटीएममध्ये खडखडाट
पुन्हा झाला मुंबईतल्या एटीएममध्ये खडखडाट
पुन्हा झाला मुंबईतल्या एटीएममध्ये खडखडाट
See all
मुंबई  -  

मुंबई शहरातील अनेक बँकांच्या एटीएममध्ये पुन्हा एकदा खडखडाट झाल्याचे चित्र पहायला मिळालं. बुधवारी पैसे नसल्यामुळे अनेक ठिकाणी एटीएम बंद ठेवण्यात आले होते. एटीएम बंद का होते याचे कारण जरी कळू शकले नसले तरी, एटीएमबाहेर उभे असलेले गार्ड मात्र पैसे संपल्याचे कारण देत होते.

या संदर्भात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉयी फेडरेशनचे सरचिटणीस विश्वास उटगी यांच्याशी संपर्क साधला असता उटगी म्हणाले, 'नव्या 2000च्या नोटा काही एटीएम मशीनसाठी वापरता येत नाहीत. तसेच काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत. त्याचबरोबर पुन्हा एकदा नव्या नोटांचा कमी पुरवठा हे आज तुटवडा भासण्याचे महत्वाचे कारण आहे. अनेक प्रायव्हेट बँकांना रिझर्व्ह बँकेने मुबलक चलन उपलब्ध न करून दिल्यामुळे हा तुटवडा भासत आहे' असंही उटगी यांनी सांगितले.

यावेळी गावी जाण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्यामुळे दादर स्टेशन लगत असलेल्या एटीएमजवळ उभ्या असलेल्या स्नेहा जांबोटी म्हणाल्या 'मला सुट्टी मिळाल्यामुळे आज गावी जायचे होते. परंतु एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्यामुळे मी आज गावी जाऊ शकणार नाही. नोटबंदीनंतर आता तरी अच्छे दिन येतील असे आम्हाला वाटले होते. तरीही या ठिकाणी उदासीनताच आहे'.

यावेळी दादर स्टेशन लगत असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे एटीएम बंद ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर बाजूच्या परिसरात असलेल्या एचडीएफसी, एसबीआय या बँकांची देखील तीच अवस्था होती.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.