Bandra
  वांद्र्यात ईव्हीएम मशीनविरोधात निदर्शने

  वांद्र्यात ईव्हीएम मशीनविरोधात निदर्शने

  Share
  Now
  मुंबई  -  

  वांद्रे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या इव्हीएम मशीनविरोधात सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान निदर्शनेही करण्यात आली.

  त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे इव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेचा वापर करा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणा, अशी मागणी ओबीसी समाजाने केली. तसेच येत्या काळात राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा सकल ओबीसी समाज महाराष्ट्र अध्यक्ष कांचन नाईक आणि वैशाली महाडिक यांनी दिला.

  निवडणूक आयोगाने जनहितार्थ निर्णय द्यावा आणि लोकशाही जिवंत होण्यास सहकार्य करावे, अशी मागणी या वेळी ओबीसी समाजाकडून करण्यात अाली. सकल ओबीसी समाज अध्यक्षा कांचन नाईक जांबोटी, खजिनदार शीला पटेल, उपाध्यक्षा वैशाली महाडिक सय्यद, निसार अली सय्यद, शैलू एन. सी. आर. के. निराळा आदींच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.