Advertisement

मागील काही महिन्यांपासून फुटलेली प्रभादेवीतील ६६ इंचाची जलवाहिनी दुरुस्त

जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील पाणीपुरवठा बंद न करता ही विक्रमी वेळात दुरुस्त केली.

मागील काही महिन्यांपासून फुटलेली प्रभादेवीतील ६६ इंचाची जलवाहिनी दुरुस्त
SHARES

महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील प्रभादेवी परिसरात ६६ इंचाची जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनीमध्ये मागील काही महिन्यांपासून मोठी पाण्याची गळती असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक अभियंता जल काम विभागाचे अधिकारी जीवन पाटील यांनी दिली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील पाणीपुरवठा बंद न करता ही विक्रमी वेळात दुरुस्त केली. महापालिकेचे सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता अमित हटवार, कनिष्ठ अभियंता वैभव गावडे (सहाय्यक अभियंता जलकामे -तातडीचा दुरुस्ती विभाग -वरळी) यांच्या मार्गदर्शनाखाली शर्तीच्या प्रयत्न करत ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली.

प्रभादेवीतील जलवाहिनीमधून वर्षापासून मोठी पाण्याची गळती होत होती. ही जलवाहिनी काँक्रिट रस्त्याच्या खाली खोलवर आणि अजिबात निदर्शनास न येणारी होती. तसंच, या गळतीचे पाणी जवळच्याच ड्रेनेज जलवाहिनीमधून निचरा होत असल्यानं सहज निदर्शनास येत नव्हती. मात्र, महापालिकेच्या सहाय्यक अभियंता जल कामे (तातडीचा दुरुस्ती विभाग- वरळी) या विभागानं काम हाती घेऊन अहोरात्र खोलवर खोदकाम करुन गळती असलेली जलवाहिनी शोधून काढली.

खोदकाम पूर्ण झाल्यावर जलवाहिनीच्या तळाशी ३ ठिकाणी गळती असल्याचं निदर्शनास आलं. मोठ्या प्रमाणात पाणी ड्रेनेज वाहिनीद्वारे वाहून जात होते. गळतीच्या तीनही ठिकाणी लाकडाच्या खुट्या मारुन गळती लगेचच बंद करण्यात आली. या जलवाहिनीद्वारे प्रभादेवी, वरळी, किस्मत टाॕकिज, सेंच्युरी बाजार, आप्पासाहेब मराठे मार्ग, सिद्धीविनायक मंदिर परिसर या भागात पाणीपुरवठा केला जातो.

नवरात्रोत्सव आणि देवी विसर्जन याच कालावधीत झाले परंतू वाहतुकीला कोणताही अडथळा न येवू देता दुरुस्तीचं काम पूर्ण केले तसेच विभागातील नियमित  पाणीपुरवठ्यावर कसलाही परिणाम होऊ न देता ही दुरुस्ती  केली. सध्यस्थितीत  या गळतीच्या ठिकाणी व्यवस्थित वेल्डिंग करुन उर्वरित काम पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती जीवन पाटील यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा