Advertisement

'ऑमिक्रॉन'ला रोखण्यासाठी मुंबईत 'जम्बो' तयारी

महापालिकेनं लगोलग आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे.

'ऑमिक्रॉन'ला रोखण्यासाठी मुंबईत 'जम्बो' तयारी
SHARES

जगभरात कोरोनाच्या नवा व्हेरिएंट 'ऑमिक्रॉन'मुळं भितीदायक वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेनं लगोलग आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी, मुंबईतील १० जम्बो कोरोना केंद्रे सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या मुंबईतील ५ जम्बो कोरोना केंद्रे कार्यरत आहेत. आता उर्वरित जम्बो कोरोना केंद्रांमधील यंत्रणा सज्ज केली जात आहे. त्याद्वारे सर्व १० जम्बो कोरोना केंद्रांमध्ये १३ हजार ४६६ खाटा उपलब्ध होणार आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवासांपासून कोरोना नियंत्रणात आल्यामुळं मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, अचानक 'ऑमिक्रॉन' स्वरूपाच्या विषाणूच्या संसर्गाची भीती निर्माण झाल्यानं महापालिकेनं पुरेशी खबरदारी घेण्याचं ठरविलं आहे.

मुंबईत १ डिसेंबरपर्यंत उपचाराधीन रुग्ण संख्या १ हजार ९०४ आहे. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेली नाहीत. तसंच, शहरातील रुग्णवाढीचा दर ०.०२ टक्के इतका कमी झाला आहे.

मुंबईत सध्या प्रमुख रुग्णालयांमधील कोरोना केंद्रांसह भायखळा, मुलुंड, वरळी-एनएससीआय, दहिसर चेकनाका, गोरेगाव अशी ५जम्बो करोना केंद्रे सुरू आहेत.

आवश्यकता भासल्यास सर्व कोरोना केंद्रांसह अन्य रुग्णालयांतील खाटा कार्यान्वित केल्यास, एकूण ३० हजार खाटा उपलब्ध होतील. मुंबईस सध्या ६९० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असताना १ हजार १२४ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याची क्षमता आहे.

जम्बो केंद्रांतील खाटांची क्षमता

  • बीकेसी २,३२८
  • मालाड २,२००
  • नेस्को गोरेगाव फेज-१ २,२२१
  • कांजुरमार्ग २,०००
  • रिचर्डसन अँड क्रुडास, मुलुंड १,७०८
  • सायन १,५००
  • नेस्को गोरगाव फेज-२ १,५००
  • रिचर्डसन अँड क्रुडास, भायखळा १,०००
  • दहिसर चेक नाका, कांदरपाडा ७००
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा