Advertisement

हरवलेली आई २ वर्षांनी मुलाला भेटली, माय-लेकाची हृदयस्पर्शी कहाणी

दोन वर्षांनी आईची भेट झाल्यानं भारावून गेलेल्या मुलानं एकता प्रतिष्ठान,पलावाचे समाजिक कार्यकर्ते यांच्यासह मानपाडा पोलीस, डोंबिवलीचे मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले.

हरवलेली आई २ वर्षांनी मुलाला भेटली, माय-लेकाची हृदयस्पर्शी कहाणी
SHARES

गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता झालेल्या एका आई (Mom)ची भेट अखेर तिच्या मुलासोबत झाली. एका स्वयंसेवी संस्था आणि मनसेच्या मदतीमुळे या मायलेकाची भेट झाली. त्यामुळे यावर्षीचा Mothers Day या मायलेकानं एकत्र साजरा केला. ही हृदयस्पर्शी घटना घडली ती डोंबिवलीत (Dombivali).


पुण्यातून बेपत्ता

गुजरातमधील बडोदा इथं राहणारे तेजस ठक्कर पूर्वी पुण्यात वास्तव्यास होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांची आई हर्षा ठक्कर पुण्यातून बेपत्ता झाली होती. हर्षा ठक्कर यांची मानसिक अवस्था ठिक नव्हती. त्या स्मतिभ्रंश या आजारानं देखील ग्रस्त होत्या. त्यावेळी तेजस यांनी पुणे पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर दोन वर्षानंतर त्यांच्या थांगपत्ता लागला.

फोटो सौजन्य

अन्नासाठी आईची वणवण

स्मृतिभ्रंश झाल्यामुळे घर, कुटुंब याबाबत एका महिलेला काहीच आठवत नव्हतं. अशा अवस्थेत अन्नासाठी भटकणारी एक महिला लॉकडाउनदरम्यान जेवण वाटप करत असताना सामाजिक कार्यकर्त्यांना दिसली. काहीतरी समस्या असल्याचं त्यांनी हेरलं. पोलीस, मनसे आमदाराच्या (MNS MLA) मदतीनं तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू झाला. सोशल मीडियाद्वारे (Social Media) अखेर तिच्या मुलाचा ठाव लागला आणि या मायलेकांची दोन वर्षांनी भेट झाली.


स्वयंसेवी संस्थेची मदत

पलावा इथं राहणारे एकता प्रतिष्ठानचे (Ekta Pratishthan) हसन खान, भास्कर गांगुर्डे आणि समीर कोंडाळकर हे सामाजिक कार्यकर्ते लॉकडाउन (Lockdown) काळात गरजूंना जेवण वाटप करत आहेत. काही दिवसांपूर्वी जेवण देत असताना त्यांना एक वृद्ध महिला निदर्शनास आली. ही महिला चांगल्या घरची असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी या महिलेला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा त्यांना या महिलेचा स्मृतिभ्रंश झाला असल्याचं लक्षात आलं. त्यांनी तत्काळ मानपाडा पोलिसांसह (Manpada Police) मनसे आमदार (MNS MLA) राजू पाटील (Raju Patil) यांना माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी या महिलेला वृद्धाश्रमात दाखल करण्यास सांगितलं. हसन खान आणि भास्कर गांगुर्डे यांनी तिला वृद्धाश्रमात नेलं. मात्र कोरोनाव्हायर (Covid-19 pandemic)मुळे तिला तिथं घेण्यास नकार देण्यात आला.


मनसेचा मदतीचा हात

मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil)  यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी महिलेचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर (social Media) अपलोड केली. काही तासांत महिलेची ओळख पटली. महिलेचं नाव हर्षा ठक्कर असून तिचा मुलगा तेजस आयटी कंपनीत कामाला असल्याची माहिती या दोघांना मिळाली. त्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी या महिलेच्या मुलाच शोध सुरू केला.

दोन वर्षांपूर्वी तेजसनं हर्षा ठक्कर हरवल्याबाबत पुणे इथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहितीही मिळाली. तेजस सध्या गुजरात इथं स्थायिक झाल्याचं कळलं. पोलिसांनी तेजसला संपर्क साधत त्याला माहिती दिली. आता प्रश्न होता तो येण्याचा. मानपाडा पोलिसांनी गुजरात पोलिसांशी समन्वय साधला. आमदार पाटील यांच्या प्रयत्नांनी त्याला तातडीनं पास मिळणं शक्य झालं.

"दोन वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासमवेत पुण्याला राहत होतो. तेव्हा माझी आई बेपत्ता झाली होती. एकता प्रतिष्ठान पलावाच्या सर्व सदस्यांचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळे मी आईला पुन्हा भेटू शकलो. आम्ही सर्व आशा गमावल्या होत्या. पण मी माझ्या आईला भेटलो, असं तेजस ठक्कर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

फोटो सौजन्य


मदर्स डे एकत्र साजरा

अखेर शनिवारी तेजसनं डोंबिवलीतून आपल्या आईला परत नेलं. दोन वर्षांनी आईची भेट झाल्यानं तेजस भारावून गेला. त्यानं एकता प्रतिष्ठान,पलावाचे समाजिक कार्यकर्ते यांच्यासह मानपाडा पोलीस, मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले.

कव्हर फोटो सौजन्य



हेही वाचा

२६/११ हल्ल्यातील साक्षीदार मुंबईच्या रस्त्यावर जगतोय हलाखीचे आयुष्य

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा