Advertisement

२६/११ हल्ल्यातील साक्षीदार मुंबईच्या रस्त्यावर जगतोय हलाखीचे आयुष्य

अजमल कसाबला शिक्षा देणं शक्य झालं ते साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे. त्यापैकीच एक साक्षीदार आहेत हरिश्चंद्र श्रीवर्धनकर. पण आज त्यांची अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल.

२६/११ हल्ल्यातील साक्षीदार मुंबईच्या रस्त्यावर जगतोय हलाखीचे आयुष्य
SHARES

मुंबई (Mumbai BMC) शहरावर आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले. त्यापैकीच एक २६/११ (26/11 Attack)चा दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात अनेकांनी प्राण गमावले. कित्येत पोलीस हुतात्मा झाले. या हल्ल्यात एकमेव दहशतवादी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हाती लागला होता. तो म्हणजे अजमल कसाब.

अजमल कसाबचं याचं नाव वाचल्यावर अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल. या दहशतवादी कसाबला फाशी देण्यात आली हे सर्वांनाच माहित असेल. पण या अजमल कसाबला शिक्षा देणं शक्य झालं ते साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे. त्यापैकीच एक साक्षीदार आहेत हरिश्चंद्र श्रीवर्धनकर. पण आज त्यांची अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल.


रस्त्यावर गुजराण

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर या साक्षीदारावर आज रस्त्यावर गुजराण करायची वेळ आली आहे. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर नावाचे ६० वर्षांचे इसम मुंबईच्या रस्त्यांवर झोपलेले काही दिवसांपूर्वी दिसून आले. जवळच असलेल्या दुकानदाराची नजर त्यांच्यावर पडली, त्यांनी हरिश्चंद्र यांची मदतही केली. त्यानंतर कळलं ही हे कोणी साधं व्यक्तीमत्व नव्हे तर ते एक साक्षीदार आहे. ते ही २६/११ दहशतवादी हल्ल्याचे. एवढेच नाही तर या हल्ल्यात त्यांना गोळीही लागली होती, त्यात ते थोडक्यात बचावले.


कुटुंबियांना नकोसे

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना कुटुंबियांनी घरातून बाहेर काढलं होतं. राहायला जागा आणि अन्न नसल्यामुळं हरिश्चंद्र गेले कित्येक दिवस मुंबईच्या रस्त्यांवर होते. याचवेळी Saath Rasta shopचे मालक डीन डिसुजा यांनी त्यांची मदत केली.


नागरिक आले मदतीला

डिसुजा यांनी हरिश्चंद्र यांना पहिले तेव्हा त्यांची प्रकृती खराब होती. त्यामुळं त्यांनी निराधारांसाठी IMCares नावाच्या स्वयंसेवी संस्था चालवणारे त्यांचे मित्र गायकवाड यांना बोलावले. गायकवाड यांनी इंडिया टुडेला “आम्ही श्रीवर्धनकरांना जे अन्न दिले ते त्यांनी खाल्लं नाही. त्यांना आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कपडे दिले. ते सतत 'हरिश्चंद्र', 'बीएमसी' आणि 'महालक्ष्मी' अशी नावं घेत होते. आम्हाला वाटले की त्याचे काही नातेवाईक इकडेच राहतात'. त्यानंतर गायकवाड यांनी बीएमसी कॉलनीमध्ये हरिश्चंद्र यांच्याबाबत चौकशी केली, त्यावेळी त्यांना कळले की हरिश्चंद्र एक साक्षीदार आहेत. २६/११ दहशतवादी हल्ल्यात त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्यानंतर आम्ही पोलिसांची मदत घेतली."

गायकवाड म्हणाले, "खेदाची बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची काळजी घ्यावीशी वाटत नाही आणि त्यांना आश्रमात दाखल करण्यास त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. लोकांनी पुढे यावं आणि या विलक्षण व्यक्तीस मदत करावी अशी आमची इच्छा आहे. त्यानं एका दहशतवाद्याला शिक्षा करण्यास मदत केली".


त्यांच्यामुळे कसाबला झाली शिक्षा

श्रीवर्धनकर यांनी २६/११ च्या हल्ल्यात एका दहशतवाद्याला आपल्या बॅगनं मारलं होतं. श्रीवर्धनकर हे अजमल कसाबला ओळखणार्‍या मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी कामा हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार सुरू केला तेव्हा हरिश्चंद्र यांना गोळीही लागली होती.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा