पालिकेच्या 'बी' वॉर्डमध्ये आणखी एका एएलएमची स्थापना

Dongri
पालिकेच्या 'बी' वॉर्डमध्ये आणखी एका एएलएमची स्थापना
पालिकेच्या 'बी' वॉर्डमध्ये आणखी एका एएलएमची स्थापना
See all
मुंबई  -  

आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आणि विविध नागरी सुविधांसाठी मुंबईच्या डोंगरी भागात पालिकेच्या मदतीने हेल्प एएलएम गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे त्या विभागात बदलही घडून आला. आता त्याच कामाची प्रेरणा घेत उमरखाडीच्या रहिवाशांनी एकत्रित येत 'सब की सेवा एएलएम' हा प्रस्ताव पालिकेच्या बी वॉर्डकडे देण्यात आला असून त्याला मान्यता देखील देण्यात आली आहे, अशी माहिती बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उद्य कुमार शिरुरकर यांनी दिली.

'सब की सेवा एएलएम'च्या अध्यक्षपदी रिझवी झाहीद हुसेन (42) यांची निवड करण्यात आली आहे.
काय आहे 'सब की सेवा एएलएम'चे कार्य?
1) ओला-सुका कचरा वेगळा करणे आणि त्याविषयी जनजागृती करणे
2) विभागात जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे
3) परिसरात नागरी सुविधांकडे प्रामुख्याने लक्ष देणे
4) पार्किंगच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे
5) विभागातील रस्त्यांची दुरवस्था यावर लक्ष देणे
6) प्रशासन आणि नागरिकांमधला दुवा बनून काम करणे

गेल्या कित्येक वर्षांपासून 'बी' वॉर्डमध्ये एकच एएलएम होते. त्याचा फायदा होत असल्याने आता या विभागात आणखी विकासकामे करण्यासाठी 'सब की सेवा' या दुसऱ्या एएलएमची स्थापना करण्यात आली असल्याचे तिथल्या रहिवाशांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.