एकाच मार्गाचं दोनदा नामकरण

 Kandivali
एकाच मार्गाचं दोनदा नामकरण
एकाच मार्गाचं दोनदा नामकरण
एकाच मार्गाचं दोनदा नामकरण
See all

कांदिवली - पालिका निवडणुका तोंडावर येताच नगरसेवक कामाला लागतात. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन शक्कल प्रत्येक पक्षाचा उमेदवार लढवत असतो. असाच काहिसा प्रकार कांदिवलीतल्या हनुमाननगर परिसरात घडलाय. इथल्या एकाच मार्गाचा दोनदा नामकरण कार्यक्रम करण्यात आला. पालिकेनं दोन वर्षांपूर्वी जेतवन बुद्ध विहार मार्ग असं नामकरण केलं होतं. पण काँग्रेसच्या नगरसेविका अंजता यादव यांनी पुन्हा नामकरण कार्यक्रमाचा घाट घातला. या कार्यक्रमात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते.

काँग्रेसच्या नामकरण कार्यक्रमाचा भाजपाकडून विरोध करण्यात आलाय. "काँग्रेस राजकारण करतंय. दोन वर्षापूर्वी या मार्गाचं नामकरण करण्यात आलंय. दुसऱ्यानं केलेल्या विकासकामाचं श्रेय काँग्रेस घेतंय," असा आरोप भाजपाचे उत्तर मुंबईचे सचिव सुधीर शिंदे यांनी केलाय.

Loading Comments