Advertisement

मुंबईत कांद्याचा तुटवडा कायम

मुंबईमध्ये कांदा तुटवडा कायम असून, गुरुवारीही आवश्यकतेपेक्षा कमी आवक झाली.

मुंबईत कांद्याचा तुटवडा कायम
SHARES

मुंबईसह राज्यभरातील जनतेला कांदा सध्या रडवतो आहे. मुंबईमध्ये कांदा तुटवडा कायम असून, गुरुवारीही आवश्यकतेपेक्षा कमी आवक झाली. गुजरातवरूनही कांदा मागविला जात आहे. होलसेल मार्केटमध्ये गुजरातचा कांदा १८ ते ३० रुपये व महाराष्ट्रातील कांदा ३८ ते ४५ रुपये किलो दरानं विकला जात आहे.

मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये सद्य:स्थितीमध्ये सरासरी प्रतिदिन १ हजार टन कांद्याची मागणी आहे. परंतु मागील काही दिवसांपासून आवक कमी होत आहे. गुरुवारी मार्केटमध्ये ७८७ टन कांद्याची आवक झाली असून, यामध्ये ४० टक्के आवक गुजरातवरून होत आहे.

फेब्रुवारीमध्ये होलसेल मार्केटमध्ये पहिल्यांदाच कांदा चाळिशीच्या पुढे गेला आहे. पुढील जवळपास एक महिना तुटवडा कायम राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही कांद्याचे दर वाढू लागले आहेत.

मुंबई बाजार समिती 

बाजार समिती
आवक(टन)
बाजार भाव
मुंबई 
७८७
३८ ते ४५
कोल्हापूर
३३६
२० ते ४७
औरंगाबाद
७५
१० ते ४२
सोलापूर
२,३३४
२ ते ५०
पुणे
१,४२५
२० ते ४३



हेही वाचा -

महापालिका करणार १५० किमीच्या रस्त्यांची दुरुस्ती

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा