Advertisement

डॉ.आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा


डॉ.आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा
SHARES

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग तसेच युक्ती मिडीया यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

या निबंध स्पर्धेसाठी ‘मी आणि राज्यघटना’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर दलित समाजातील रोल मॉडेल’, ‘बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत’ असे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी १२ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत babasahebjayanti@gmail.com या इमेल आयडीवर निबंध पाठवता येतील. 

निबंधासोबत नाव, वय, शिक्षण, व्यवसाय या गोष्टी नमूद करणे अनिवार्य आहे. प्रथम तीन क्रमाकांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तर १० जणांना उत्तेजानार्थ पारितोषिक देण्यात येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये निबंध पाठवता येतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा