सोमवारी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघरमध्ये पावसाच्या अंदाजामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यांमध्ये शहरी पूर येण्याची शक्यता आहे.(Heavy to very heavy rainfall warning in many parts of the state till September 30)
नागरिकांसाठी चेतावणी सूचना
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत किनारी आणि घाटमाथ्याच्या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मदत आणि बचाव पथके सतत तयार ठेवण्यात आली आहेत.
भारत हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन, राज्य आपत्कालीन संचालन केंद्राने जिल्हानिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
राज्यभरात २४x७ कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतीही समस्या उद्भवल्यास त्वरित खालील आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.