कांदिवलीत रस्त्याचं पथविच्छेदन

 Kandivali
कांदिवलीत रस्त्याचं पथविच्छेदन
कांदिवलीत रस्त्याचं पथविच्छेदन
कांदिवलीत रस्त्याचं पथविच्छेदन
कांदिवलीत रस्त्याचं पथविच्छेदन
See all

कांदिवली - वॉर्ड क्रमांक 28च्या काँग्रेस नगरसेविका गीता यादव यांच्या अथक प्रयत्नातून एका रस्त्याचं डांबरीकरण झालं खरं, पण रहिवाशांना या रस्त्याचं अक्षरशः विच्छेदन करावं लागलंय. या ऑपरेशनचं कारणं होतं अतिउत्साह...

काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्या निधीतून कांदिवलीच्या गणेशनगर दुर्गा मंदिर येथे 15 दिवसांपूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं. बराच गवगवा करून हे काम केलं खरं, पण ते करताना उत्साहाच्या भरात गटाराची झाकणंही डांबरीकरण करून कायमची बंद करण्यात आली होती. खड्डे बुजवताना लावलेले पेव्हर ब्लॉकसुद्धा काढले नाहीत अशी परिस्थिती होती. त्यामुळे या झाकणांवरचा डांबराचा थर तोडून ती खुली करावी लागली. अशा प्रकारच्या कामामुळे मूळ हेतूलाच काळिमा फासला जातो, असं मत स्थानिक रहिवासी अजित नाईक यांनी व्यक्त केलं. गीता यादव यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास असमर्थता व्यक्त केली.

Loading Comments