Advertisement

हॅप्पी बर्थडे मिस्टर मोल्ट


हॅप्पी बर्थडे मिस्टर मोल्ट
SHARES

मुंबईतील जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये शनिवारी अनोखं सेलिब्रेशन झालं. राणीच्या बागेतील सध्या आकर्षण असलेल्या सहा पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात अाला. तिसरा वाढदिवस

या बर्थडे बाॅय पेंग्विनचं नाव मिस्टर मोल्ट असून शनिवारी त्याचा तिसरा वाढदिवस झाला. मोल्टच्या वाढदिवसासाठी पेंग्विन कक्ष फुगे, पताका लावून सजवलेला होता. यावेळी पेंग्विन पाहण्यासाठी आलेल्या लोकांना मोल्टची स्पेशल चित्रफीतदेखील दाखवण्यात अाली. काही दिवसांपूर्वी मोल्ट आणि फ्लिपर याच नर- मादीच्या जोडीनं अंडं दिलं होतं. हे अंड उबवण्याचे काम दोन्हीही पेंग्विन आळीपाळीने करतात. मुख्य कक्षातच हे अंड असल्याने विशेष काळजी घेत हा भाग वाढदिवसानिमित्त सजवण्यात आला.हेही वाचा -

मुंबईत लेप्टोचा सहावा बळी

विलेपार्ले ते गोरेगावमध्ये २४ जुलैला पाणीकपात
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा