Advertisement

विलेपार्ले ते गोरेगावमध्ये २४ जुलैला पाणीकपात


विलेपार्ले ते गोरेगावमध्ये २४ जुलैला पाणीकपात
SHARES

वेरावली टेकडी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि.मी. व्यासाच्या ‘आरे’ तील अंतर्गत जलवाहिनीवर महत्त्वाचं काम येत्या २४ जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे काम दुपारी दोन वाजता हाती घेण्यात येणार असून हे काम त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यामुळे या दिवशी विलेपार्ले ते गोरेगावपर्यंतच्या भागात २० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.


या भागांमध्ये होणार कपात

अंधेरी व जोगेश्वरी पूर्व भाग : बी. टी. रोड, समर्थनगर, आर. आर. ठाकूर मार्ग, प्रतापनगर, शिवटेकडी, पारसनगर, आनंदनगर अग्रवालनगर, जोगेश्वरी कॅव्हेज रोड, एच. एफ. सोसा. रोड,पी. पी. डायस कंपाऊंड, नटवरनगर १ ते ५, सारस्वत बाग, फ्रान्सिसवाडी, साई सिद्धी संकुल, सुभाष रोड, बांद्रेकरवाडी, प्रेमनगर, इदगाह मैदान, अंधेरी प्लॉट, बांद्रा प्लॉट, इन्कमटॅक्स कॉलनी, हेमा इंडस्ट्री,मेघवाडी रोड क्रमांक २, मेघवाडी शाखा, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), पंप हाऊस, जिजामाता रोड, वास्तू संकुल, विजय राऊत रोड, अपना घर रेल्वे कॉलनी, जुना नागरदास रोड, आंबेवाडी, आर. के. सिंग रोड, पी. पी. रोड, गुंदवली गावठाण, मोगरापाडा,

विलेपार्ले, अंधेरी व जोगेश्वरील पश्चिम भाग : पटेल इस्टेट, वैशालीनगर, अमृतनगर, एस. व्ही. रोड परिसर, शास्त्रीनगर, अक्षा मस्जिद परिसर, आर. सी. पटेल चाळ, क्रांतीनगर, गुलशननगर, अजित ग्लास परिसर, रेलीफ रोड, बेहराम बाग, विकासनगर, परेरा कंपाऊंड, शक्तीनगर, पटेलवाडी, स्काऊट कॅम्प रोड, काजूपाडा, आनंदनगर, पाटलीपुत्र म्हाडा, गणेशनगर, प्रथमेश संकुल, साईनाथनगर, कंट्री क्लब परिसर, सहकार रोड, जोगेश्वरी स्टेशन जवळील परिसर, कॅप्टन सुरेश सामंत रोड, अग्रवाल इस्टेट, यादवनगर,

गोरेगाव : बिंबीसार म्हाडा कॉलनी, एस.आर.पी.एफ.कॅम्प, महानंदा डेरी, बांद्रेकरवाडी ते नेस्को, वनराई कॉलनी, गोरेगाव (पूर्व) व ओ. डी. सी., राम मंदीर, ना. सी. फडके मार्ग, तेली गल्ली, जीवा महाले रोड आदी भाग



हेही वाचा - 

पावसामुळे परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची २३ जुलैला फेरपरीक्षा

खड्ड्यांची भूक जास्त, पण कोल्डमिक्सच कमी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा