Advertisement

पावसामुळे परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची २३ जुलैला फेरपरीक्षा

जुलै महिन्यांत दोन ते तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातील परीक्षांना मुकावं लागलं होतं. या परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारी २३ जुलै रोजी होणार आहे.

पावसामुळे परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची २३ जुलैला फेरपरीक्षा
SHARES

जुलै महिन्यांत दोन ते तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातील परीक्षांना मुकावं लागलं होतं. या परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारी २३ जुलै रोजी होणार आहे.

याचा फटका विद्यार्थ्यांना

दोन आठवड्यापूर्वी मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. परिणामी या पावसाचा फटका मुंबई विद्यापीठातल्या अनेक परीक्षांना बसल्यानं या परीक्षा पुढं ढकलंत फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

नुकतंच विद्यापीठानं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं. या परीक्षा येत्या सोमवारी घेण्यात येतील. २५ जून, ३ जुलै आणि ९ जुलै रोजी परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे. या परीक्षांमध्ये एमएससी, एमए, एमकॉम या अभ्यासक्रमाच्या विषयांसोबत एलएलबी सेमिस्टर एक आणि पाचच्या तीन विषयांचाही समावेश आहे.
- विनोद मळाळे, उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा