Advertisement

मुंबईत लेप्टोचा सहावा बळी


मुंबईत लेप्टोचा सहावा बळी
SHARES

मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिस या आजाराने अाता ६ वा बळी घेतला अाहे. भांडुप पूर्व विभागात राहणारा सिद्धेश माणगावकर या २७ वर्षीय तरुणाचा लेप्टोस्पायरोसिस या आजारामुळे शुक्रवार सकाळी मृत्यू झाला.  सिद्धेश हा इंजिनीयर असून तो कुटुंबाचा एकमेव आधार होता. यापूर्वी कुर्ला, गोवंडी, माहीम, वरळी, सायन येथील ५ जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे.


फुप्फुस, मूत्रपिंड निकामी

१३ जुलैला संध्याकाळी कामातून परतताना त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आई - वडिलांनी तातडीने मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्याला दाखल केले. फोर्टिस रुग्णालयात  उपचार होत असताना त्याचे फुप्फुस, मूत्रपिंड आणि अन्य अवयव निकामी होत गेले. त्यानंतर सिद्धेश औषधांना काहीही प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याची प्राणज्योत मालवली.  फोर्टिस रुग्णालयात दाखल करतेवेळी सिद्धेश बेशुद्धावस्थेतच होता. आठ दिवस त्याला शुद्ध आली नव्हती. त्याच्यामागे आई, वडील आणि लहान बहीण आहे.

मागील आठवड्यात सिद्धेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला प्टोस्पायरोसिसची लागण झाली असल्याचे निदान झाले.  आमच्याकडून रुग्णाला वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला. मात्र, रुग्ण कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हता, असं मुलुंड फोर्टिस रुग्णालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. 



हेही वाचा -

'त्याने' मरणानंतर वाचवले तिघांचे प्राण

Exclusive: भायखळ्यातील 'त्या' कैद्यांना अन्नबाधा की औषधबाधा?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा