Advertisement

मुसळधार पावसामुळं मुंबईत ३३ बळी

मुंबईसह आसपासच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळं मुंबईतील रस्ते जलमय झाले असून, पुरस्थिती निर्माण झाली.

मुसळधार पावसामुळं मुंबईत ३३ बळी
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळं मुंबईतील रस्ते जलमय झाले असून, पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळं रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी चाकरमान्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जाव लागलं. शिवाय, काहींसाठी मुसळधार पाऊस आणि शनिवारची रात्रही काळरात्र ठरली. शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसंच घरांची पडझड अशा ५ दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास चेंबूर येथील न्यू भारत नगर इथं संरक्षक भिंतीचा भाग ४ ते ५ घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले. दुसऱ्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडूनदेखील येथे आवश्यक मदत रवाना करण्यात आली. सहा फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन यांच्यासह २० कामगार रविवारी दिवसभर येथे मदतकार्य करत होते. हे ठिकाण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित आहे.

विक्रोळी इथं शनिवारी मध्यरात्री २.४० वाजता सूर्यानगरमधील पंचशील चाळीतील ६ घरांवर दरडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजावाडी इथं दाखल ४ आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल एका जखमीचा मृत्यू झाला असून, महात्मा फुले रुग्णालयात दाखल जखमीस राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या जखमीची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त ठिकाणे वनविभागाच्या अखत्यारित आहेत. येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मदतकार्य दिवसभर सुरू होते.

  • रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चांदिवली इथं संघर्ष नगरमध्ये दरडीचा काही भाग इमारत क्रमांक १९ वर पडला. यात २ लोक जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
  • रविवारी पहाटे ५ वाजता भांडुप पश्चिम येथील कोंबडीगल्ली येथील अमरकुल विद्यालयाजवळ असलेल्या चाळीतील घराचा भाग कोसळून सोहम महादेव थोरात (१६) हा मुलगा जखमी झाला.
  • मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 
  • रविवारी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास अंधेरी येथील फिरदौस मिठाईवाला यांच्या दुकानात इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे जखमी झालेले सलीम पटेल (२६) यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटे सव्वाचार वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा