Advertisement

मुंबईत अखेर पेट्रोलनं घाटली शंभरी

मुंबईत पेट्रोलच्या दरानं अखेर शंभरी घाटली. शनिवारी मुंबईत पेट्रोल १०० रुपये १९ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे.

मुंबईत अखेर पेट्रोलनं घाटली शंभरी
SHARES

मुंबईत (mumbai) पेट्रोलच्या दरानं अखेर शंभरी घाटली. शनिवारी मुंबईत पेट्रोल १०० रुपये १९ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २६ पैसे, तर डिझेल दरात २८ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राज्यांमध्ये स्थानिक मूल्यवर्धित कर वेगळा असल्यानं इंधनाचे दर वेगवेगळे असतात.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ९३ रुपये ९४ पैसे झाले असून डिझेलचे दर ८४ रुपये ८९ पैसे झाले आहेत. गेल्या ४ मेपासूनची ही १५वी इंधन दरवाढ आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी दरवाढ १८ दिवस रोखण्यात आली होती. राजस्थानात श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०४.९४ पैसे लिटर असून डिझेल ९७ रुपये ७९ पैसे आहे. गेल्या महिन्याभरात १५ वेळा इंधनाची दरवाढ करण्यात आली आणि त्यात पेट्रोलचे दर ३ रुपये ५४ पैसे, तर डिझेलचे दर ४ रुपये १६ पैशांनी वाढवण्यात आले आहेत.

रेल्वे प्रवासावर निर्बंध आणि बसमध्ये होणारी गर्दी, दिरंगाई यामुळे खासगी वाहनाने प्रवास करण्याकडे बहुतांश नोकरदारांचा कल वाढला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधनदरांमुळे हा प्रवास महाग होऊ लागला आहे. अशा महागाईत जगणे कठीण बनले आहे.

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारनं कठोर निर्बंध लावले असले तरी, खासगी कंपन्या, उद्योग, मोठमोठे व्यवसाय यांचे काम थांबलेले नाही. अत्यावश्यक सेवांप्रमाणेच अनेक खासगी उद्योगांनाही र्निबधांतून सूट देण्यात आली आहे. मात्र, या नोकरदारांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाही.

बहुतांश कर्मचारी खासगी दुचाकी, चारचाकी वाहनाने कामावर ये-जा करत आहेत. इंधन दरांत होणाऱ्या सततच्या वाढीमुळे त्यांचा हा प्रवास दिवसेंदिवस महाग होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी आठवड्याला २५० रुपयांचे पेट्रोल लागायचे, आता त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहेत. प्रवासाचा खर्च वाढला, परंतु पगार तेवढाच आहे.



हेही वाचा 

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचे नियम १५ जूनपासून लागू

यंदाचं वर्ष आयपीओचं, आतापर्यंत ३० कंपन्यांचा सेबीकडं अर्ज


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा