Advertisement

विधानभवनाच्या कँटीनमधील उसळीत चिकन?

विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधानभवनातील कँटीनच्या जेवणातील मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

विधानभवनाच्या कँटीनमधील उसळीत चिकन?
SHARES

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या कँटीनमधील मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सहकार विभागातील अधिकारी अधिकारी मनोज लाखे कँटीनमध्ये जेवत असताना त्यांना उसळीत चिकनचे तुकडे आढळले. अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या कॅंटीनमध्ये नेते, अधिकारी आणि पत्रकार जेवण करण्यासाठी जात असतात. असं असूनही कँटीन चालकाने निष्काळजीपणा दाखवल्याने रोष व्यक्त होत आहे.

कारवाई करण्याची मागणी

मनोज लाखे यांनी घडलेला प्रकार विधानसभेचे सचिव जितेंद्र भोळ यांच्या निदर्शनास आणून दिला आणि याबाबत तक्रार केली. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घडल्या प्रकाराबाबत माफी

या प्रकरणी कॅंटीन पर्यवेक्षक रविंद्र नागे यांनी झालेल्या प्रकाराबाबत मनोज लाखे यांची माफी मागितली. तसंच, हा प्रकार जाणूनबुजून घडला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.  



हेही वाचा -

मुख्यमंत्री कोण? ही तर मीडियाची चर्चा- देवेंद्र फडणवीस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा