Advertisement

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली, 400 हून अधिक घरात घुसले पाणी

पाण्याचा प्रवाह इतका होता की, यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे.

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली, 400 हून अधिक घरात घुसले पाणी
SHARES

घाटकोपर (Ghatkopar) असल्फा विभागात 72 इंचाची जलवाहिनी (Water Pine Line Burst) फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा प्रचंड फवारा पाहायला मिळत आहे. याचा प्रवाह इतका होता की, यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे. 

घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे, त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहे. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.

30 डिसेंबर रोजी रात्री मुंबईतील असल्फा परिसरात लोक घरात झोपलेले असताना 72 इंचाची पाण्याची पाइपलाइन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले.

अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला, मिळालेल्या माहितीनुसार, या पाण्याचा दाब इतका जोरदार आहे, की ते सुमारे 10 फुटांपर्यंत उसळत आहे.

मध्यरात्री 2 ते 2.30 पर्यंत पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली, मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या जलवाहिनीतून पाण्याचा वेग अद्यापही कमी झालेला नाही, घराबाहेर पडणारे लोक पाण्याचा वेग लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा