Advertisement

PMMV योजना मुंबईतही; पहिल्या बाळासाठी मातांना ५ हजारांची मदत

पहिल्या बाळाला जन्म देणाऱ्या मातांना या योजनेंतर्गत तब्बल पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ १ जानेवारी २०१७ या दिवसापासून प्रसूत होणाऱ्या प्रत्येक गरोदर महिलेला मिळणार आहे.

PMMV योजना मुंबईतही; पहिल्या बाळासाठी मातांना ५ हजारांची मदत
SHARES

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पीएमएमव्हीवाय) राज्य सरकारकडून राबववण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्याची अंमलबजावणी मुंबईतही केली जाणार आहे. पहिल्या बाळाला जन्म देणाऱ्या मातांना या योजनेंतर्गत तब्बल पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ १ जानेवारी २०१७ या दिवसापासून प्रसूत होणाऱ्या प्रत्येक गरोदर महिलेला मिळणार आहे. मात्र, ज्या महिलांना प्रसुती कालावधीचा लाभ मिळणार आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.


१ जानेवारी, २०१७पासून लाभ

या योजनेची अंमलबजावणी मुंबईत केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त सुनील धामणे आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१७या दिवशी व त्यानंतर ज्या माता गरोदर अथवा प्रसूत झालेल्या आहेत, त्यांना याचा लाभ मिळणार आहे. हा लाभ फक्त प्रथम जिवंत बाळांकरताच असणार आहे.



५ हजारांची रक्कम ३ हप्त्यांत

एकूण पाच हजार रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. गरोदर राहिल्यानंतर १५० दिवसांमध्ये महिलेची नोंदणी झाल्यानंतर तिला एक हजार रुपयांचा मोबादला दिला जाईल. त्यानंतर बाळाच्या जन्मानंतर दोन हजार आणि बाळाच्या पहिल्या लसीकरणाच्या वेळी दोन हजार अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हा निधी मिळणार आहे. पहिल्या २ हप्त्यांसाठी लाभार्थीची व पतीच्या आधारकार्डची आवश्यकता नाही. परंतु, लाभार्थीच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे. मात्र हे संयुक्त बँक खाते नसावे, असेही सुनील धामणे यांनी स्पष्ट केले.


निधी थेट लाभार्थींच्या खात्यात

१७ एप्रिल २०१८पासून या योजनेबाबत मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षण घेण्यात आले असून सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण विभागनिहाय करण्यात येत आहे. गरोदर महिलेकडून याबाबत अर्ज भरून घेत त्यांची नोंदणी केल्यानंतर विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संगणकावर माहिती नोंदवून ती राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे. त्याच्या मान्यतेनंतर आर्थिक निधी लाभार्थींच्या खात्यात थेट जमा होणार आहे. महापालिका प्रशासन हे लाभार्थी आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार आहे. हा सर्व निधी राज्य सरकार देणार आहे.



हेही वाचा

१०६ हुताम्यांच्या नातेवाईकांना नोकरी, घर द्याच!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा