महिलेच्या गर्भपिशवीत २.७५ किलोची गाठ; कूपरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

महिलेच्या गर्भपिशवीतली पावणे तीन किलो वजनाची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया कूपर रुग्णालयात करण्यात आली. कूपर रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका ३६ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीत एक मोठी (Fibroid Uterus) गाठ आढळली होती.

SHARE

महिलेच्या गर्भपिशवीतली पावणे तीन किलो वजनाची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया कूपर रुग्णालयात करण्यात आली. कूपर रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका ३६ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीत एक मोठी (Fibroid Uterus) गाठ आढळली होती.


२ तास चालली शस्त्रक्रिया

कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने केलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल २.७५ किलो वजनाची गाठ या महिला रुग्णाच्या पोटातून काढण्यात आली आहे. तसंच, आता या महिलेची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया २ तास चालली.


नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी कूपर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात एक महिला पोटदुखी आणि रक्तस्रावाची तक्रार घेऊन उपचारांसाठी आली होती. या आधीच दोन मुलांची आई असलेल्या या महिलेचे पोट हे साधारणपणे ७ महिन्यांच्या गरोदर महिलेप्रमाणे दिसत होते. या महिलेची अधिक तपासणी आणि आवश्यक त्या चाचण्या केल्या असता, महिलेच्या गर्भपिशवीत मोठी गाठ आढळून आली.


४ डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

ही गाठ वाढत असल्याने आणि त्या महिलेच्या जिवाला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानुसार डॉ. गणेश शिंदे, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. हेमलता कुहिते, डॉ. हेमा रेलवानी आणि डॉ. नेही पारीख या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सलग दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये ही मोठी गाठ यशस्वीरीत्या काढली.


गर्भाशयातील गाठीची महत्त्वाची लक्षणं

गर्भाशयात गाठ असणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होणे (Dysmenorrhea), मोठ्या प्रमाणात रक्तस्रावाचा त्रास होणे (Menorrhagia), लैंगिक संबंधांदरम्यान त्रास होणे (Dyspareunia) अशी लक्षणे दिसून येतात. या प्रकारची लक्षणं आढळून आल्यास महिलांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले.हेही वाचा

एका क्लिकवर रुग्णांची माहिती! ९३६० रुग्णांना महापालिकेचे हेल्थकार्ड

गंभीर आजारालाही तिनं हसून दिलं उत्तर!


संबंधित विषय
ताज्या बातम्या