Advertisement

कमला मिल आगीत अनेकांचा जीव वाचवणाऱ्या पोलिसाचा सन्मान


कमला मिल आगीत अनेकांचा जीव वाचवणाऱ्या पोलिसाचा सन्मान
SHARES

२९ डिसेंबरच्या रात्री कमला मिल कंपाऊंड परिसरात वन अबव्ह या पबला लागलेल्या आगीत अनेकांचा जीव वाचवणाऱ्या मुंबई पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन शिंदे यांचा सन्मान मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.



अनेकांचा वाचवला जीव

या आगीच्या घटनेबद्दल पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन शिंदे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत अनेकांचा जीव वाचवला. त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने पबमध्ये अडकलेल्या लोकांना आपल्या खांद्यावर उचलून पबच्या बाहेर काढलं.

शिंदेंना दिलेल्या प्रशस्तीपत्रात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलं आहे की, दुर्दम्य इच्छाशक्तीसोबतच तुम्ही दाखवलेल्या शौर्याबद्दल मला शहराचा प्रथम नागरिक असल्याचा गर्व आहे. मी मुंबईच्या सर्व नागरिकांच्यावतीने आपल्या प्रयत्नांचा आदर करतो"

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा