Advertisement

मुंबई विमानतळावर पोलिओ लसीकरण

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिओ लसीकरण करण्याच आलं.

मुंबई विमानतळावर पोलिओ लसीकरण
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिओ लसीकरण करण्याच आलं. देशातील एकही मूल पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी शासकीय यंत्रणांकडून विशेष प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळानेही पुढाकार घेतला.

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्यानं मुंबई विमानतळावर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत १५२ मुलांना पोलिओ लस देण्यात आली. त्यात पाच वर्षांखालील ८० मुलांचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर नियमांचे भान राखत काउंटरची संख्या वाढविण्यात आली, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

२०१० पासून मुंबई विमानतळावर पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास ९३०० मुलांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात पाच वर्षांवरील मुलांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे, अशीही माहिती देण्यात आली.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा