Advertisement

पूर्व उपनगरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

पूर्व उपनगरातील अनेक मोठ्या व महत्वाच्या रस्त्यांची खड्ड्यामुळं दुर्दशा झाली आहे.

पूर्व उपनगरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य
SHARES

मुंबई महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येते. रस्त्यावर डांबरीकरण केलं जातं असून, खड्डे बुजवण्याचं काम प्राधान्यानं केलं जातं. तसंच इतके-इतके खड्डे बुजवण्यात आल्याचा दावाही महापालिकेकडून केला जातो. परंतु, पावसाळा सुरू झाला की रस्त्यांची दुर्दशा पाहायला मिळते. त्यानुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरातील रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे. पूर्व उपनगरातील अनेक मोठ्या व महत्वाच्या रस्त्यांची खड्ड्यामुळं दुर्दशा झाली आहे.

दाट लोकवस्तीला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांची चाळणी झाली आहे. चेंबूर, कुर्ला, टिळकनगर, गोवंडी, मानखुर्द, व घाटकोपर या परिसरातील अनेक छोट्यामोठ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सायन-पनवेल महामार्ग तसंच, घाटकोपर व मानखुर्द विभागांना जोडणाऱ्या जिजाबाई भोसले मार्गाची खड्ड्यामुळं दुर्दशा झाली आहे. या खड्ड्याबाबत येथील रहिवाश्यांनी वारंवार तक्रार दाखल केल्या. त्यानंतर या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत खड्डे बुजविण्यात ही आले.

दरम्यान, फ्लेवर-फ्लॉकनं हे खड्डे बुजविल्यानं पुन्हा या मार्गावर खड्डे निर्माण झाले आहेत. खड्ड्यामुळं या रस्त्यांवर अपघात होत असून, खड्ड्यामधील माती बाहेर आल्यानं दुचाकी घसरत असल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा