अंधेरीत गुरुवारी उड्डाणपुलाचा स्लॅब चालत्या वाहनावर कोसळला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्थानकाजवळ दुपारी साधारण 3 च्या सुमारास ही घटना घडली. स्लॅब कोसळण्यामागचे कारण समोर आलेले नाही.
स्लॅबचा काही भाग कारच्या बोनेटवर पडल्याने गाडीचे नुकसान झाले. मात्र वाहनचालक थोडक्यात बचावला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच वॉर्ड कर्मचारीदेखील घटनास्थळी आले.
कोसळलेल्या स्लॅबचा फोटो शेअर करताना कार्यकर्ते झोरू भाथेना म्हणाले, "फ्लायओव्हरचा स्लॅब पडला आहे..जोगेश्वरी फ्लायओव्हर..वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे...अंधेरी प.
Slab of flyover has fallen
— Zoru Bhathena (@zoru75) July 4, 2024
Jog Flyover
Western Express Highway
Andheri W
My BMC
My MMRDA
My MSRDC
Multiple agencies for construction
None for maintenance
This is My Mumbai pic.twitter.com/4w6SobYipz
एका अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार," हा उड्डाणपूल 1900 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगरपालिकेकडे हा उड्डाणूल 2022 मध्ये हस्तांतरित करण्यात आला. या उड्डाण पुलाखालची जागा व्यावसायिकांसाठी होती. मात्र कोर्ट केसमुळे बांधकाम थांबवण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराला या घटनेविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून काही उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे."
उड्डाणपुलाचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता होती. मात्र तो भाग आता काढण्यात आला आहे. बीएमसीने लेखापरीक्षण अहवालात काही शिफारशी केल्या होत्या. त्यानंतर गेल्याच वर्षी या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे.
मुंबई काँग्रेसने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शहराच्या आसपास बांधण्यात आलेले आणि अधोरेखित असलेल्या सर्व पायाभूत प्रकल्पांची तातडीने तपासणी करण्याची आवश्यक्ता आहे."
हेही वाचा