सीएसटीमध्ये पालिका उभारणार सेल्फी पॉईंट

  Pali Hill
  सीएसटीमध्ये पालिका उभारणार सेल्फी पॉईंट
  मुंबई  -  

  मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पालिका मुख्यालय इमारत या दोन्ही ऐतिहासिक इमारती परिसरात पर्यटकांना सेल्फी काढता यावा यासाठी स्वतंत्रपणे सेल्फी पॉईंट उभारण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. त्यामुळे आता पर्यटकांना ऐतिहासिक इमारतींसोबत सेल्फी काढणे सोयीचे ठरणार आहे. या कामासाठी सुमारे 80 लाख 45 हजार 208 रूपये खर्च करण्यात येणार आहे. सीएसटी हे युनोस्कोनं राज्यातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक म्हणून घोषित केलंय. तसेच सीएसटी रेल्वे स्थानकाची इमारत ही ताजमहलनंतर छायाचित्रणासाठी देशातील प्रेक्षणिय इमारत म्हणून ओळख आहे. तसेच त्या लगत असणारी पालिकेची मुख्य इमारत ही सुद्धा देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलंय. या दोन्ही ऐतिहासिक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पर्यटक येत असतात. संपूर्ण इमारतीसह आपला सेल्फी टिपण्यासाठी भर रस्त्यात उभ राहून पर्यटक सेल्फी काढत असतात त्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होऊन पर्यटकांच्या जिविताला धोका होऊ शकतो. हे लक्षात घेऊन पालिकेनं सीएसटी सबवेच्या वरील भागात पर्यटकांसाठी सेल्फी पॉईट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्याची व्हेंन्टीलेशन यंत्रणा अद्यावत करण्यात येणार आहे. तसेच सीएसटी जवळील भाटीया बागेचे सुशोभिकरण केले जाणार आहे. हा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीपुढं मंजुरीसाठी ठेवण्यात आलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.