Advertisement

मध्य रेल्वेवर 6 जूनला पावर ब्लॉक

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन करण्याचा तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे

मध्य रेल्वेवर 6 जूनला पावर ब्लॉक
SHARES

मध्य रेल्वे, मुंबई विभाग आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने पॅनल काढण्यासाठी येत्या 6 जून (शनिवार) ते 7 जून (रविवार) पर्यंत आसनगाव आणि तानशेत स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक (power block) घेण्यात येणार आहे.

6 जूनला दुपारी 2 वाजेपासून ते रात्री 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचे परिणाम होणार आहे.

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे (central railway) प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन (short termination) करण्याचा म्हणजेच नियोजित थांब्याआधीच येणाऱ्या थांब्याला शेवटचा थांबा करण्याचा, तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोणकोणत्या गाड्या रद्द :

  • 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - धुळे एक्सप्रेस
  • 11012 धुळे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मनमाड पंचवटी एक्सप्रेस
  • 12110 मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन :

  • 17611 हुजूर साहेब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दिनांक 05.06.2026 मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
  • 12072 हिंगोली डेक्कन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026 रोजीची नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
  • 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026 मनमाड येथून शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येईल.
  • 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026 रोजीची नाशिक रोड येथून शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येईल.

डाउन गाड्यांचे पुनर्निधारण:

  • 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेल जेसीओ (06.06.2026) चे वेळापत्रक बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 07.06.2026 रोजी 01.20 वाजता प्रस्थान होईल (नियोजित प्रस्थान वेळ 06.06.2026 रोजी 21.10 वाजता)
  • 12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेल जेसीओ दिनांक 06.06.2026 रोजीची गाडी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 07.06.2026 रोजी 01.30 वाजता सुटेल. (नियोजित सुटण्याची वेळ 06.06.2026 रोजी 22.15 वाजता)
  • 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अमृतसर एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026 रोजीची ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 07.06.2026 रोजी पहाटे 02.00 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ 06.06.2026 रोजी 23.30 वाजता)
  • 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोरखपूर विशेष जेसीओ दिनांक 06.06.2026 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 07.06.2026 रोजी पहाटे 04.00 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल. (नियोजित सुटण्याची वेळ 06.06.2026 रोजी 22.30 वाजता)
  • 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बनारस महानगरी एक्सप्रेस जेसीओ दिनांक 07.06.2026 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 07.02.2026 रोजी पहाटे 02.15 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ 00.15 वाजता)
  • 02141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर विशेष जेसीओ दिनांक 07.06.2026 रोजीची ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 07.06.2026 रोजी 02.30 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ 00.20 वाजता)
  • 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस - शालिमार एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026 रोजीची ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 07.06.2026 रोजी 01.20 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ 06.06.2026 रोजी 22.00 वाजता)
  • 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 07.06.2026 रोजी 01.45 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ दिनांक 06.06.2026 रोजी 22.45 वाजता)
  • 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र एक्सप्रेस जेसीओ (दिनांक 06.062026) ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी दिनांक 07.06.2026 रोजी 02.00 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ दिनांक 06.06.2026 रोजी 23.35 वाजता)
  • 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ (दिनांक 07.06.2026) ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी दिनांक 07.06.2026 रोजी 02.15 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ 00.15 वाजता)
  • 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ (दिनांक 07.06.2026) ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी दिनांक 07.06.2026 रोजी 02.30 वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित प्रस्थान वेळ 00.35 वाजता)

खालील गाडी जेसीओ दिनांक 06.60.2026 कल्याण- कर्जत-पुणे - मनमाड मार्गे वळवण्यात येईल.

  • 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस- बलिया कामायनी एक्सप्रेस
  • 01027 दादर- गोरखपूर विशेष
  • 15066 पनवेल- गोरखपूर एक्सप्रेस
  • 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बल्लारशाह एक्सप्रेस
  • 12131 दादर - साईनगर एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026 कल्याण- कर्जत- पुणे - साईनगर शिर्डी मार्गे वळवण्यात येईल.
  • 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस जेसीओ दिनांक 06.06.2026
  • कल्याण -कर्जत- पुणे - दौंड कॉर्ड - मनमाड मार्गे वळवण्यात येईल.

अप गाड्यांचे नियमन जेसीओ 05.06.2026

  • 01026 बलिया- दादर विशेष कसारा येथे 1 तास 45 मिनिटांनी
  • 18030 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस इगतपुरी येथे 50 मिनिटे
  • 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल इगतपुरी येथे 20 मिनिटांनी
  • 20104 भटनी - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस भुसावळ विभागावर 10 मिनिटांनी
  • 11082 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस भुसावळ विभागात योग्यरित्या
  • 22537 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्स्प्रेस भुसावळ विभागात योग्य ठिकाणी.
  • 11062 जयनगर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस भुसावळ विभागात योग्य ठिकाणी.
  • 01080 गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष भुसावळ विभागात योग्य ठिकाणी.
  • 11203 नागपूर - मडगाव जेसीओ दिनांक 06.06.2026 रोजी भुसावळ विभागात 30 मिनिटे.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे (suburban railway)कामकाज

ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन

  • 06.06.2026 रोजी 11.42 ते 20.44 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा उपनगरीय ट्रेनचा प्रवास आसनगाव येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.
  • 06.06.2026 रोजी 21.32 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा उपनगरीय ट्रेनचा प्रवास खडवली येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.
  • 06.06.2026 रोजी 22.47 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा उपनगरीय ट्रेनचा प्रवास टिटवाळा येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.
  • 06.06.2026 रोजी 00.08 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा लोकलचा प्रवास दिनांक 07.06.2026 रोजीची गाडी कल्याण येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
  • 06.06.2026 रोजी 13.31 ते 22.00 वाजेपर्यंत कसारा येथून सुटणाऱ्या कसारा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन आसनगाव येथूनच पुढे सुरू (शॉर्ट टर्मिनेट) होतील.

शेवटची आणि पहिली लोकल

  • कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची डाउन लोकल N13 असेल, जी दिनांक 06.06.2026 रोजी सकाळी 10.16 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
  • कसारासाठी ब्लॉकनंतरची पहिली डाउन लोकल N3 असेल, जी दिनांक 07.06.2026 रोजी पहाटे 04.19 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वीची शेवटची अप लोकल N18 असेल, जी दिनांक 06.06.2026 रोजी दुपारी 12.19 वाजता कसारा येथून सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतरची पहिली अप लोकल N2 असेल, जी दिनांक 07.06.2026 रोजी पहाटे 03.51 वाजता कसारा येथून सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण सेक्शनवरील मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.



हेही वाचा

गिरगावातील वारंवार वीज खंडित होण्यावर BESTचा मोठा निर्णय

वसई किल्ल्यातील 3 ऐतिहासिक चर्चचे संवर्धन होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा