Advertisement

मुंबईतून विक्रमी 2127 मेगावॅट विजेची मागणी

सोमवार, 15 एप्रिल रोजी विजेची मागणी 3,973 वर पोहोचली आणि दुसऱ्या दिवशी ती 4,041 वर गेली. शहरातील सर्वाधिक तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली.

मुंबईतून विक्रमी 2127  मेगावॅट विजेची मागणी
SHARES

प्रामुख्याने उत्तर, वायव्य व मध्य मुंबईतील 30 लाख ग्राहकांकडून बुधवारी विक्रमी 2,127 मेगावॉट विजेची कमाल मागणी नोंदवण्यात आली. अदानी इलेक्ट्रिसिटीचे हे ग्राहक होते. दरम्यान मुंबईची कमाल वीज मागणी त्यावेळी 4,041 मेगावॉट इतकी होती.

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या 30 लाखांहून अधिक ग्राहकांनी याआधी 31 मे 2023 रोजी विक्रमी 2,082 मेगावॉट विजेची कमाल मागणी नोंदवली होती. तो विक्रम 2,127 मेगावॉटसह मोडित निघाला आहे.

यंदा ही मागणी पूर्ण करताना कंपनीने डहाणू येथील औष्णिक केंद्रातून 500, सौर ऊर्जा स्रोतांमधून एक हजार तर वीज खरेदी कराराच्या अन्य स्रोतांमधून उर्वरित विजेचा अखंडित पुरवठा केला. मुंबईच्या 4,041 मेगावॉटच्या कमाल मागणीत टाटा पॉवरने 1,004 मेगावॉट व बेस्टने 910 मेगावॉट अखंडित विजेचे वितरण ग्राहकांना केले.

यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात विजेचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के वाढला असून, तो 70.66 अब्ज युनिटवर पोहोचला आहे. आर्थिक उलाढाल वाढत असल्याचे आणि हवामानामुळे विजेच्या वापरात लक्षणीय वाढ होत असल्याचे हे द्योतक असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने नमूद केले आहे.

यंदा एक ते 15 एप्रिल या काळात विजेचा वापर 70.66 अब्ज युनिट झाला. मागच्या वर्षी याच काळात हा वापर 64.24 अब्ज युनिट होता. याच पंधरवड्यात एकाच दिवसात 218 गिगावॉट इतका विक्रमी वीज पुरवठा केला गेला आहे. एप्रिल 2023मध्ये 206 गिगावॉट विजेचा पुरवठा केला गेला होता.

मागील वर्षी संपूर्ण एप्रिल महिन्यात 216 गिगावॉट विजेचा पुरवठा झाला होता. मंत्रालयाने एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या ऋतूसाठी 260 गिगावॉट विजेचा पुरवठा करावा लागेल असे गृहीत धरले आहे.

उत्तर, वायव्य व मध्य मुंबईतील 30 लाख ग्राहकांकडून बुधवारी विक्रमी 2,127 मेगावॉट विजेची कमाल मागणी नोंदवण्यात आली. अदानी इलेक्ट्रिसिटीचे हे ग्राहक होते. दरम्यान मुंबईची कमाल वीज मागणी त्या वेळी 4,041 मेगावॉट होती.

मुंबईत वीज आणणाऱ्या वाहिन्या जुन्या असल्याने त्यात बिघाडाची घटना बुधवारी पुन्हा घडली. विजेचा भार सहन न झाल्याने पडघ्याहून कळव्याला येणाऱ्या 400 केव्ही क्षमतेच्या वाहिनीवर अति वीज भारामुळे दबाव आला. त्यामुळे 163 मेगावॉट वीज प्रवाह थांबला. परिणामी अत्याधिक उष्णता व उकाड्याच्या स्थितीत नवी मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवली महापालिका भागांतील 50 हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित झाला होता.Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा