Advertisement

जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी

आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला.

जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी
SHARES

खेळताना (Dahi Handi 2022) थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत (Prathmesh Sawant) या तरुणाचे आज मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) निधन झाले. प्रथमेशवर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला.

प्रथमेश सावंतचे वय 20 वर्ष होते. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधी थरावरून कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले होते. 

प्रथमेश हा आपल्या स्थानिक मंडळाच्या गोविंदा पथकात सहभागी झाला होता. दहीहंडी फोडताना गोविंदाच्या थरावरून कोसळल्याने प्रथमेशला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पाठिचा कणा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे शरीराची हालचाल आणि संवेदना बंद झाली होती. प्रथमेशवर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

प्रथमेश सावंत याच्या निधनाने काळाने कुटुंबावर घाला घातला आहे. प्रथमेश लहान असताना त्याच्या आईचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यानंतर त्याचे वडील आणि बहिणीचे एका आजाराने निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रथमेशचा सांभाळ चुलते करत होते. आयटीआयचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे कामही तो करत होता. प्रथमेशच्या उपचारासाठी मोठा खर्च आला होता. त्यासाठी काहींनी मदत केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने त्याच्या उपचारासाठी 5 लाखांची मदत केली होती. संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा