Advertisement

मान्सूनपूर्व कामांना रेल्वे प्रशासनाकडून सुरुवात


मान्सूनपूर्व कामांना रेल्वे प्रशासनाकडून सुरुवात
SHARES

दरवर्षी पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्यास रेल्वे वाहतपक ठप्प होते. परंतु, ही वाहतुक ठप्प होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे मान्सूनपूर्व काम हाती घेतली जातात. यंदाही ही काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतली आहे. मात्र, लोकल सेवा, एक्सप्रेस सेवा सुरु असल्याने कामे करण्यास अनेक अडथळे येत आहेत.

मान्सुनपूर्व कामांसाठी काही वेळा मेगाब्लॉक घेतले जातात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळं या काळात रेल्वे प्रशासन मान्सूनपूर्व कामं वेगात करण्यात येत आहेत. पावसाळ्यात रेल्वे मार्गाकडील नाल्यामुळं रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होते. त्यामुळं सुरुवातीला नालेसफाई केली जात आहे.

पहिल्या फेरीत ३० किमीचा रेल्वे मार्गालगतची अरुंद नाल्यांची साफसफाई केली आहे. तर, १५० मोठ्या गटारांची स्वच्छता केली आहे. ज्याठिकाणी झाड्यांच्या फांद्या छाटण्याची आवश्यकता आहे, तेथे छाटणी सुरु आहे. जुन्या झालेल्या ओव्हर हेड वायर काढण्यात आल्या आहेत, अशी कामे पहिल्या फेरी झाली आहेत. दादर, भायखळा येथील भागातील अरुंद नाले, घाटकोपर येथील मोठा गटार, कळवा कारशेड इथं पम्पिंग लाईन दुरुस्त करणं, एलटीटी येथील अनावश्यक गवत काढले जात आहे. घाट भागातील ओव्हर हेड वायर दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल करणे सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील रेल्वे कमर्चारी मान्सूनपूर्व कामं करत आहेत. सोशल डिस्टन्स रेल्वे कर्मचाऱ्यामध्ये वापरले जात आहे. यासह सॅनिटायझर, मास्क प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले जात आहे. नालेसफाई, ओव्हर हेड वायर, रेल्वे रुळांची देखभाल, काही उपकरणांना गंजरोधक रंग लावण्याचे काम, रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, रुळांशेजारचा कचरा उचलण्याचे काम, नालेसफाईबरोबरच या सखल भागातील रुळांची उंची वाढवणे, त्यासाठी रुळांखाली खडी टाकणे, स्लीपर्स बसविण्याची कामे जोमात सुरु आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा