पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे पीसीओएस असेल तर गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. अनेकदा गर्भधारणा शक्य नसते असा दृढ समज असतो. मात्र पीसीओएसच्या तक्रारीसंदर्भात योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास गर्भधारणा होऊ शकते, हे महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
पीसीओडीचे प्रमुख कारण हे इन्सुलिन प्रतिरोध असते. मात्र पीसीओएससाठी (PCOAS) अन्य कारणे आहेत. त्याचे निदान व उपचार योग्यवेळी केले तर तसा त्रास असलेल्या स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकते.सामान्यतः अशा स्रियांना नैसर्गिक गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.
प्रजनन वयातील महिलांच्या अंडाशयांमध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि काही प्रमाणात ॲन्ड्रोजन्स (पुरुषांमध्ये असलेले हार्मोन्स) तयार होतात. त्यासाठी पिट्युटरी ग्रंथीमधील एफएचएस आणि एचएल या दोन हार्मोन्सचे नियमन अतिशय गरजेचे असते.
या प्रक्रियेने अंडोत्सर्ग (ovulation) आणि नियमित पाळीचे चक्र सुरळीत राहते. मात्र पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) असलेल्या महिलांमध्ये अंडाशयामधून अधिक प्रमाणात ॲड्रोनज स्त्रवते. त्यामुळे ओव्हुलेशन प्रक्रिया सुरळीत होत नाही.
त्यामुळे अनियमित मासिक पाळी, अंडाशयांवर लहान गाठी, त्वचेवर मुरुमे, अनावश्यक केसांची वाढ आणि वजन वाढणे अशा प्रकारच्या तक्रारी दिसतात. गर्भधारणेमध्येही अडचणी निर्माण होतात.
योग्यवेळी निदान आणि वैद्यकीय उपचार मिळाले तर या समस्येवर मात करता येते असे महापालिकेच्या (bmc) केईएम रुग्णालयांमध्ये (KEM hospital) यासंदर्भात झालेल्या वैद्यकीय संशोधनामध्ये दिसून आले आहे. हार्मोनल तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष यातून दिसून आला आहे.
एंडोक्रिनॉलॉजी विभागातील डॉ. मंजिरी कार्लेकर यांनी या विषयावर अभ्यास केला आहे. त्यात पीसीओएस तसेच यासदृश कुशिंग सिन्ड्रोम, ॲक्रोमेगाली, हायपर प्रोलॅक्टिनेमिया किंवा थायरॉइडसारखी समस्या योग्य निदान व वैद्यकीय उपचारांनी बरी होऊ शकते.
अशा स्वरूपाच्या तक्रारी असतील तर एंड्रोक्रिनोलॉजिस्ट पीसीओएस असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स (शरीरात इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होणे) असते. ज्यामुळे हार्मोनल समस्या गुंतागुंतीची होते. परिणामी प्रजननक्षमतेच्या अडचणी, रक्तातील चरबी आणि शर्करेच्या पातळीत अनियमितता आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
बहुतांश रुग्णांमध्ये या आजाराचे मूळ कारण वजन अधिक असणे, लठ्ठपणा असते. त्यामुळे आहारात बदल, वजन कमी करणे यामुळे हार्मोनल संतुलन सुधारता येते. पीसीओएससारख्या दिसणाऱ्या हायपर प्रोलॅक्टिनेमिया, हायपोथायरोडीझम किंवा ॲड्रिनल ग्रंथीचे विकार यासारख्या समस्यांचे दीर्घकाळ निदान होत नाही.
वैद्यकीय उपचारांसाठी आलेली एका 32 वर्षीय महिलेमध्ये वंध्यत्वाची तक्रार होती. अनेक चाचण्यांमध्ये तिचे निदान पीसीओएस असल्याचे झाले होते. हार्मोन असंतुलनामुळे तिला कृत्रिम गर्भधारणेचा पर्याय निवडावा लागेल असे सांगण्यात आले. एका जवळच्या मैत्रीणीने तिला केईएम रुग्णालयातील एंडोक्रिनोलॉजी (endocrynology) विभागामध्ये जाऊन वैद्यकीय सल्ला घेण्यासंदर्भात सुचवले.
विभागाचे प्रमुख डॉ. तुषार बंडगर यांनी वैद्यकीय सल्ला दिला. त्यावेळी वैद्यकीय तपासणीमध्ये तिला "नॉन-क्लासिक कॉन्जेनायटल अॅड्रिनल हायपरप्लेसिया" (एड्रिनल ग्रंथीतून हार्मोन्सचा अतिस्राव) हा आजार असल्याचे निदान झाले. यासाठी वैद्यकीय उपचार तसेच गोळ्या सुरु केल्यानतंर काही महिन्यांत तिला नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली आता ती एका सुदृढ बाळाची आई आहे.
हेही वाचा