प्रेरणा मैदान नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत

 Malad
प्रेरणा मैदान नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत
प्रेरणा मैदान नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत
See all

मालाड - मालाड पश्चिमेकडील सोमवार बाजारातलं प्रेरणा मैदान नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या मैदानात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. विशेष म्हणजे मैदानात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जी खेळणी होती, तीही तुटलेली आहेत. मैदानासमोर शिवसेनेची शाखा आणि मालाड पोलीस स्टेशन आहे. तरीही मैदानाची अशी अवस्था का, असा प्रश्न स्थानिकांना पडलाय. याबाबत स्थानिक नगरसेवक दीपक पवार यांना विचारलं असता, लवकरच दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Loading Comments