Advertisement

राज्यातील मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

प्रसिद्ध उद्योजक अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण, तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात असून राज्यातील ६ मान्यवरांचा यांत समावेश आहे.

राज्यातील मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान
SHARES

प्रसिद्ध उद्योजक अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण, तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात असून राज्यातील ६ मान्यवरांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रातून एका मान्यवरास पद्मविभूषण, एका मान्यवरास पद्मभूषण तर ४ मान्यवरांस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


डॉ. कुकडे यांना पद्मभूषण

वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉ. कुकडे यांनी लातूर इथं विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना रास्तदरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे मोलाचं कार्य केलं आहे.


४ मान्यवरांना पद्मश्री

या समारंभात ४८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील ४  मान्यवरांचा समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सैय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. दुष्काळी भागातील गुरांची देखभाल करण्यात सैय्यद शब्बीर यांचे अमूल्य योगदान आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून गायींची देखभाल व त्यांना जगविण्याचं काम ते अव्याहतपणे करत आहेत.

तर ज्येष्ठ अभिनेते दिनयार काॅट्रँक्टर यांनी कला व नाट्य क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसंच सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रा. सुदाम काटे  यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.




हेही वाचा - 

Movie Review : वास्तवाची जाणीव अन् व्यवस्थेला टोला

खोतकर-ठाकरे भेटीनंतरही तोडगा नाहीच; जालन्याच्या जागेवर रविवारी अंतिम निर्णय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा