Advertisement

खोतकर-ठाकरे भेटीनंतरही तोडगा नाहीच; जालन्याच्या जागेवर रविवारी अंतिम निर्णय

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं नाव अंतिम मानलं जात असतानाही जालन्याच्या जागेसाठी शिवेसनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेदेखील इच्छुक आहेत. जालन्याच्या जागेसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी खोतकर यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

खोतकर-ठाकरे भेटीनंतरही तोडगा नाहीच; जालन्याच्या जागेवर रविवारी अंतिम निर्णय
SHARES

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं नाव अंतिम मानलं जात असतानाही जालन्याच्या जागेसाठी शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेदेखील इच्छुक आहेत. जालन्याच्या जागेसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी खोतकर यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु या भेटीनंतरही त्यावर तोडगा निघाला नसल्यामुळे रविवारी यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.


निर्णय आपल्याच बाजूने

अर्जुन खोतकर यांनी माध्यमाशी बोलताना रविवारी या जागेवर निर्णय होणार असल्याचं सांगितलं. तसंच रविवारी मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र असून त्यावेळी जालन्याच्या जागेबद्दल निर्णय घेण्यात येईल. तसंच दोन्ही नेते जो काय निर्णय घेतील तो अंतिम असेल,’ असं खोतकर यांनी स्पष्ट केलं.


शिवसेना जिंकणारच

जालन्याची जागा का सोडावी हे आपण उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. तसंच ही जागा शिवसेनेला मिळाल्यास ही जागा नक्कीच जिंकू असा विश्वास आपण त्यांना दिल्याचाही खोतकर म्हणाले. तसंच काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय झाला नसून लोकसभेच्या जागेबद्दल रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.




हेही वाचा - 

अनिल अंबानी तुरूंगात जाणार?

पूल दुर्घटनेला मुंबईची गर्दी जबाबदार; ‘सामना’तून मुंबईकरांवरच खापर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा