Advertisement

पूल दुर्घटनेला मुंबईची गर्दी जबाबदार; ‘सामना’तून मुंबईकरांवरच खापर

मुंबईचा आणि मराठी माणसाचा पुळका असलेल्या शिवसेनेने किंवा त्यांच्या नेत्यांनी सीएसएमटी पूल दुर्घटनेबाबत एकही शब्द काढला नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यापैकी कोणीही जखमींची भेटही घेतली नाही किंवा विचारपूसही केली नाही, यावरून मुंबईकरांमध्ये प्रचंड रोष आहे.

पूल दुर्घटनेला मुंबईची गर्दी जबाबदार; ‘सामना’तून मुंबईकरांवरच खापर
SHARES

मुंबईचा आणि मराठी माणसाचा पुळका असलेल्या शिवसेनेने किंवा त्यांच्या नेत्यांनी सीएसएमटी पूल दुर्घटनेबाबत एकही शब्द काढला नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यापैकी कोणीही जखमींची भेटही घेतली नाही किंवा विचारपूसही केली नाही. त्यातच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून पूल दुर्घटनेचं खापर मुंबईच्या गर्दीवर आणि प्रशासनीक यंत्रणांवर फोडण्यात आलंय. 


काय म्हटलंय अग्रलेखात ?

मुंबईचा अनियंत्रित विस्तार, प्रचंड लोकसंख्येचा येथील नागरी आणि इतर सुविधांवर पडणारा ताण, त्यामुळे बिघडलेले शहर नियोजन अशा अनेक कारणांमुळेच मुंबईची अवस्था सध्या बिकट झाली आहे. पुन्हा या नागरी सेवासुविधा, इतर व्यवस्था, त्यांची दुरुस्ती-देखभाल आणि जबाबदारी हेदेखील एक त्रांगडेच झाले आहे. मुंबई महापालिका, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, नॅशनल हायवे अॅथॉरिटी वगैरे अशा अनेक प्रशासन यंत्रणांची कामे एकाच वेळी या महानगरीत सुरू असतात. मात्र ‘अनेक पायांची शर्यत’ झाल्याने ती रखडतात. त्यातून मग एखादी दुर्घटना घडते आणि जबाबदारी आणि दोषारोपांचे बोट एकमेकांकडे दाखवले जाते. त्याचाही परिणाम कामांच्या वेगवान पूर्ततेवर आणि गुणवत्तेवर होतोच.


असंवेदनशीलता ?

पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. परंतु उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणीही रूग्णांची साधी विचारपूसही केली नाही. त्यातच पालिकेच्याच निष्काळजीपणामुळे हा पूल कोसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्यानंतरही अग्रलेखातून अशी भूमिका मांडणं किंवा जखमींची विचारपूस करण्याऐवजी अमरावतीत असलेल्या संयुक्त सभेला हजेरी लावणं, त्यातही त्या दुर्घटनेविषयही एकही शब्द न काढणं हे असंवेदनशील असल्याचं मत मुंबईकर व्यक्त करत आहेत.



 हेही वाचा - 

हिमालय पुलाचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचं कार्यालय गायब

हिमालय ब्रिज दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा