Advertisement

हिमालय पुलाचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचं कार्यालय गायब


हिमालय पुलाचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचं कार्यालय गायब
SHARES

मुंबईच्या सीएसटी परिसरात हिमालय पूल पडल्याची दुर्घटना गुरूवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत ६ जणांंचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पूलाच्या ऑडिटचं काम ज्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या नीरज देसाई दिलीप देसाई असोसिएट इंजिनियरिंग कन्स्लटन्ट कंपनीविरोधात प्रश्न उपस्थित होऊ लागले. या कंंपनीच्या कार्यलयाला भेट दिली असता. कंपनीने हे कार्यालय दोन महिन्यापूर्वीच बंद केल्याचं उघडकीस आलं आहे.


दोन महिन्यांपूर्वी बंद

नीरज देसाई दिलीप देसाई असोसिएट इंजिनियरिंग कन्स्लटन्ट कंपनीचं कार्यालय अंधेरी पश्चिम येथे आहे. या कार्यालयाचा पत्ता पालिकेने दिलेल्या अधिकृत कागदपत्रांवर देण्यात आला आहे. ज्या इमारतीत हे कार्यालय होतं तेथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारेे वसंत भाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कार्यालय दोन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलं आहे.



पर्ल हेरिटेज

 पूर्वी ही इमारत पाच मजली होती. २०११ मध्ये या इमारतीची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर इमारतीचे नाव " पर्ल हेरिटेज" असे नोंदवण्यात आलं. मात्र, देसाई यांच्या कंपनीने पालिकेत कार्यालयाचा पत्ता प्लाॅट नंबर १९, no १८, चौथा मजला, बीडेडी पाटील बिल्डिंग, दाऊद बग लेन, अंधेरी, मुंबई-५८ असा दिला आहे. नियमानुसार कार्यालयाचा पत्ता असलेल्या ठिकाणाहून कंपनीचे व्यवहार होतात. तो पत्ता देणं गरजेचं आहे. मात्र कंपनीचं कार्यालयच त्या ठिकाणी नसल्याचं तपासात समोर आलं आहे.




हेही वाचा - 

हिमालय ब्रिज दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन

हिमालय ब्रिज दुर्घटनेविरोधात हायकोर्टात याचिका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा