Advertisement

हिमालय ब्रिज दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन

मुंबईतील हिमालय ब्रिज दुर्घटनाप्रकरणी पालिकेच्या दोन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य अभियंत्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.

हिमालय ब्रिज दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन
SHARES

मुंबईतील हिमालय पूल दुर्घटनाप्रकरणी पालिकेच्या पूल विभागातील मुख्य अभियंता ए. आर. पाटील आणि साहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते यांचं निलंबन करण्यात आले आहे. तर पूल विभागाचे निवृत्त प्रमुख अभियंता एस.ओ.कोरी, उपमुख्य अभियंता आर. बी. तारे आणि उपमुख्य अभियंता ए.आय. इंजिनिअर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. तसंच स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कारणे दाखवा नोटीस

पूल दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर आता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.  स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्ट या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. तर या आरपीएस या कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 


अधिकाऱ्यांवर गुन्हा

या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला झाला असून ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळं या प्रकरणी जबाबदार असलेल्या रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे.



हेही वाचा -

हिमालय ब्रिज दुर्घटनेविरोधात हायकोर्टात याचिका

महापालिका, आयआयटी आणि रेल्वेचा पुलांच्या ऑडिटमध्ये गलथानपणा




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा