Advertisement

महापालिका, आयआयटी आणि रेल्वेचा पुलांच्या ऑडिटमध्ये गलथानपणा

एलफिन्स्टन पूल चेंगराचेंगरी आणि अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वेकडून मुंबईतील ४४५ पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक पूल तोडून नव्याने तयार करण्याचे सुचविण्यात आले होते.

महापालिका, आयआयटी आणि रेल्वेचा पुलांच्या ऑडिटमध्ये गलथानपणा
SHARES

सीएसएमटी स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता कोसळला. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी पडले तर ३१ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या पूलाचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. ऑडिटमध्येया पूलाची स्थिती योग्य असून, किरकोळ दुरुस्ती करण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, तरीही हा पूल कोसळल्याने मुख्यमंत्र्यांनी या पुलाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


४४५ पुलाचं ऑडिट

एलफिन्स्टन पूल चेंगराचेंगरी आणि अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वेकडून मुंबईतील ४४५ पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक पूल तोडून नव्याने तयार करण्याचे सुचविण्यात आले होते. मात्र, सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पुलाची बांधणी १९८४ मध्ये करण्यात आली होती. त्यामुळं हा पूल जास्त जुना झाला नव्हता. 


२०० वर्ष जूने पूल

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एकूण किती पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पूल आहेत. या पुलांचं बांधकाम कधी करण्यात आलं. पुलांची तपासणी करण्यासाठी एकूण किती अधिकारी आहेत. तसंच एका अधिकाऱ्याकडे किती पुलांच्या तपासणीची जबाबदारी आहे याची माहिती आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी मागितली होती. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कर्जत आणि कसारा दरम्यान एकूण ७१ रेल्वे पादचारी पुल असून १६३ पादचारी पूल आहेत. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते सूरत दरम्यान एकूण १४६ पादचारी पूल असून, ४६ रेल्वे पादचारी पुल आहेत. यामधील काही पूल २०० वर्ष जूने असून जीर्णावस्थेत आहेत.


ऑडिटमध्ये डागडूजी, तोडकाम करण्यासाठी सुचविलेले पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पुल :

  •  यल्लो गेट पादचारी पूल मस्जिद पूर्व
  • एमके रोड चंदनवाडी पादचारी पूल मरीन लाइन्स
  • एमके रोड चंदनवाडी रेल्वे पादचारी पूल मरीन लाइन्स
  • हंसा भुगरा मार्ग पाईप पूल
  • एसबीआय कॉलनी, पूल
  • गांधी नगर कुरार गाव, पूल
  • वालभात नाला गोरेगाव, पूल
  • रामनगर चौक, दहिसर, पूल
  • विट्ठल मंदिर, दहिसर, पूल
  • एसव्हीपी रोड, दहिसर पूल
  • अकुर्ली रोड, दहिसर, पूल
  • हरी मस्जिद, साकीनाका, पूल
  • टिळक नगर, रेल्वे पादचारी पूल
  • बर्वे नगर, घाटकोपर पादचारी पूल



हेही वाचा -

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला जागा देण्याचा निर्णय योग्यच, राज्य सरकारचं न्यायालयात स्पष्टीकरण

मुंबईकर जीव धोक्यात घालून करतात प्रवास, दीड वर्षात ३ पूल दुर्घटना



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा