Advertisement

हिमालय ब्रिज दुर्घटनेविरोधात हायकोर्टात याचिका

गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनजीक असलेल्या हिमालय ब्रिज दुर्घटनेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे.

हिमालय ब्रिज दुर्घटनेविरोधात हायकोर्टात याचिका
SHARES

गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनजीक असलेल्या हिमालय ब्रिज दुर्घटनेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे.

२२ मार्चला सुनावणी

या प्रकरणाची सुनावणी २२ मार्च रोजी होणार आहे. तसंच एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेत हिमालय ब्रिज दुर्घटनेचा मुद्दा टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यांची ही मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे.

गुन्हे दाखल करा

सतत होणाऱ्या या दुर्घटनांप्रकरणी रेल्वेचे जनरल मॅनेजर, महापालिका आयुक्त आणि महापौरांवर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ जखमींची विचारपूस केली आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.

हेही वाचा -

महापालिका, आयआयटी आणि रेल्वेचा पुलांच्या ऑडिटमध्ये गलथानपणा

मुंबईकर जीव धोक्यात घालून करतात प्रवास, दीड वर्षात ३ पूल दुर्घटना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा