Advertisement

मुंबईकरांना दिलासा, मालमत्ता करातील दरवाढ 1 वर्ष पुढे ढकलली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.

मुंबईकरांना दिलासा, मालमत्ता करातील दरवाढ 1 वर्ष पुढे ढकलली
SHARES

मुंबईतील मालमत्ता करात किमान पुढचं एक वर्ष कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी याबाबतची माहिती विधानसभेत बोलताना दिली. मालमत्ता करता दर पाच वर्षांनी वाढ करण्यात येते. ही वाढ पुढच एक वर्ष करु नये, अशा सूचना मुख्यमत्र्यांनी पालिका (BMC 2022) आयु्क्तांना दिल्यात.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना मालमत्ता कर किमान पुढचं एक वर्ष जैसे थेच ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे मुंबईच्या मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ पुढे ढकलण्यात आलेली होती. ही वाढ या वर्षी करण्यात येणार होती. पण नियोजित वाढ पुढचं किमान एक वर्ष करु नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

मुंबईतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती. त्यात भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखळकर, तर शिंदे गटातील सदा सरवणकर यांच्यासह यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, सुनिल राणे, दिलीप लांडे, प्राकश सुर्वे, अमित साटम या आमदारांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. मुंबईतील मालमत्ता करात 16 ते 20 टक्के वाढ करु नये, अशी मागणी या आमदारांनी केली होती. आमदारांनी केलेली मागणी मान्य करत एकनाथ शिंदे यांनी मालमत्ता करात वाढ न करण्याच्या सूचना दिल्यात.

गेल्या वर्षी 2021मध्येही मुंबई पालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता करातील वाढ एका वर्षासाठी स्थगित केली होती. मार्च 2021मध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर याआधी 2015 साली मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली. त्यानंतर मुंबईत मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली नाही. 2020 साली ही वाढ करण्यात येण्याची शक्यता होती.

मात्र कोरोनामुळे ही दरवाढ पुढे ढकलली गेली. त्यानंतर 2021 साली 14 टक्के दरवाढ मालमत्ता करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला झालेल्या तीव्र विरोधामुळे ही दरवाढ स्थगित करण्यात आलेली. 2021 साली घेण्यात आलेल्या मालमत्ता करवाढीच्या निर्णयामुळे पालिकेचं उत्त्पन्न तब्बल 1 हजार कोटी रुपयांनी वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. पण आता पुन्हा हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.हेही वाचा

बीडीडी चाळ पुनर्विकासात पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे : मुख्यमंत्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा