राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार ८ मार्च २०२१ रोजी सादर केला. यावेळी त्यांनी मुंबईच्या पायाभूत सोईंच्या उभारणीकरीता राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. अर्थसंकल्पात मुंबईसाठी १९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील काही बहुतांश प्रस्तावित प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देतानाच काही नव्या प्रकल्पांनाही हात घालण्यात आला आहे.
- बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद
- वांद्रे-कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यानादरम्यान पादचारी पूल बांधण्यात येईल. त्यासाठी ९८ कोटी ८१ लाख रुपये खर्च अपेक्षित
- मुंबईतील पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळा मार्फत स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारण्यात येणार
- मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वरळी, वांद्रे भांडुप वर्सोवा आणि मालाड इथं सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा निर्णय आणि त्याकरता १९ हजार ५०० कोटी रुपये अपेक्षित
- समुद्राचं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प मालाडमध्ये मनोरी इथं उभारण्याचं प्राथमिक सर्वेक्षण, याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२१ डिसेंबर आधी सादर केला जाईल
- मिठी नदी पुनरुजीविकरण प्रकल्प मार्च २०२१ पासून सुरु होणार, त्यासाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- दहिसर बोईसर आणि ओशिवरा नदी पुनरुजीविकरणासाठी १ हजार ५५० कोटींची कामे सुरु, मुंबईतील इतर नद्यांबाबत अभ्यास
- वरळी दुग्धशाळेच्या १४ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरु
- मुंबई कोस्टल रोडचं काम २०२४ च्या आधी पूर्ण करण्याचं नियोजन असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली
- वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या कामाला सुरूवात
- ठाणे खाडीला समांतर सुमारे १५ किमी लांबीच्या कोस्टल रोडसाठी १, २५० कोटींचा खर्च अपेक्षित
- ६६०० कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या कामाची निविदाविषयक कार्यवाही सुरु
- मुंबई, ठाणे, नवी मुंबई दरम्यान जलमार्ग विकसित करणार, पहिल्या टप्पयात वसई ते कल्याण या मार्गावर वाहतूक सुरु करण्यात येईल. कोलशेत, काल्हेर, डोंबिवली आणि मिरा भाईंदर या ४ ठिकाणी जेट्टी उभारण्यात येईल
- मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ कल्याण फाटा, शीळ फाटा आणि कल्याण जंक्शन यावर उड्डाण पुलांची निर्मिती, महामार्गाचं रुंदीकरण, कल्याण फाटा अंडरपासचं काम प्रगतीपथावर
- मुंबई शहरातील रेल्वे रुळावरील ७ उड्डाण पुलांचं काम प्रगतीपथावर
- मुंबईतील १४ मेट्रो प्रकल्पांची ३३७ किलोमीटर लांबीची कामं पूर्णत्वाच्या टप्प्यावर, या कामांसाठी १ लाख ४० हजार ८१४ कोटी खर्च अपेक्षित, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चं काम २०२१ मध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
- ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार
- शिवडी-न्हावा -शेवा प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न,
- वांद्रे-वरळी सागरी मार्ग न्हावा-शेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चारपदरी महामार्गाचं काम सुरु, हे काम ३ वर्षांत पूर्ण करण्याचं नियोजन
- विरार, भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या शहरांच्या विकासासाठी आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावा-शेवा मार्गाला जोडणाऱ्या १२६ किलोमीटर लांबीच्या विरार ते अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनाचं काम महाराष्ट्र सरकारच्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरु
- बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम ४४ टक्के पूर्ण, ५०० किमीचा रस्ता १ मेपासून वाहतुकीसाठी खुला होणार.
- ईस्टर्न फ्रिवे आता विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्ग म्हणून ओळखला जाणार
- समृद्धी महामार्ग आणि नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार
- मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी
(proposed fund for infrastructure and transportation for mumbai in maharashtra budget 2021)