Advertisement

maharashtra budget 2021: महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवार यांची घोषणा

महाविकास आघाडीच्या सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सोमवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी महिला दिनानिमित्त अजित पवार यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.

maharashtra budget 2021: महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवार यांची घोषणा
SHARES

महाविकास आघाडीच्या सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सोमवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी महिला दिनानिमित्त अजित पवार यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. 

महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत अजित पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असं म्हणत त्यांनी नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची त्यांनी घोषणा केली.

 आजच्या महिला दिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घराला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

कोणतंही कुटुंब यापुढं राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१ पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत दिली जाईल. ही सवलत एक टक्के असेल अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा