Advertisement

पोलिसांनाही पीपीई किट द्या, हायकोर्टात जनहित याचिका

वैद्यकीय सेवा देणाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही पीपीई किट द्या, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनाही पीपीई किट द्या, हायकोर्टात जनहित याचिका
SHARES

वैद्यकीय सेवा देणाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही पीपीई किट द्या, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण पगारासह त्यांना धोकादायक परिस्थितीत जादा काम केल्याबद्दल वेगळा भत्ता जाहीर करा, अशीही मागणी या याचिकेत केली आहे. पुण्यातील एक वकील तौसिफ शेख आणि सामाजिक कार्यकर्ता सतीश गायकवाड यांनी अॅडव्हकेट गणेश गुप्ता यांच्यातर्फे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणंं अपेक्षित आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी पोलीस रात्रंदिवस काम करत आहे. कोरोनाची लागण होण्याचा धोका पत्करून ते आपलं कर्तव्य बजावत आहेत. राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सरकारी अधिकाऱ्याच्या पगारात कपात करु नये जेणेकरुन त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. 

मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 49 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचाही यामध्ये समावेश आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांना मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर पुरवण्यात आले आहेत. मात्र या गोष्टी पुरेशा नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. खडतर परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिसांना त्यांचा पूर्ण पगार देऊन सोबत धोकादायक परिस्थितीत काम केल्याबद्दल स्वतंत्र भत्ताही द्यावा. तसंच वैद्यकीय सेवेतील लोकांप्रमाणेच पोलिसांनाही पीपीई किट देण्यात यावेत. जेणेकरुन कोरोनाशी मुकाबला करण्यात आघाडीवर असलेल्या पोलिसांना दिलासा मिळेल आणि त्यांचं मनोधैर्य वाढेल, अशी मागणी हायकोर्टाकडे या याचिकेतून करण्यात आली आहे.



हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा