मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

यमांचं पालन न करणाऱ्या अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई
SHARES

मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका अधिक वाढला असून, या पार्श्वभूमीवर महापालिका, राज्य सरकार, डॉक्टर व पोलिस यांनी वारंवार नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साबणाने स्वच्छ हात धुवा, तोंडाला मास्क लावा, इतरांशी बोलताना अंतर ठेवा असं आवाहन केलं आहे. मात्र तरिही लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक तोंडाला मास्क न लावताच घराबाहेर पडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 

सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावल्यानं पोलिसांनी तब्बल १३३० नागरिकांविरोधात कारवाई केली आहे. तोंडाला मास्क लावून घरा बाहेर पडणं बंधनकारक केलं आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रदुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेनं ८ एप्रिल रोजी संपुर्ण मुंबईत हा नियम लागू केला होता. भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येपैकी निम्मी संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच मास्क न घातलेल्यास संबंधितावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १८८ अंतर्गत या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा असा इशारा महापालिकेनं दिला आहे. मात्र तरिही मुंबईत अनेकांनी या नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळं सोमावरच्या रात्रीपर्यंत पोलिसांनी १३३० जणांवर कारावई केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा