
दर पावसाळ्यात अंधेरी (andheri) सब-वे जलमय होऊन वाहतूक आणि प्रवासात मोठा अडथळा ठरतो. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने मुंबई महापालिकेच्या (bmc) वतीने सब-वेसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
सब-वेतील वाहतूक सुरळीत रहावी पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी उड्डाणपुल (flyover) उभारणीची हालचाल पालिका प्रशासनाने सुरू केली होती.
मात्र पूल उभारणे अशक्य आहे, असा अहवाल सल्लागाराने मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सब-वे तुंबून परिस्थिती जैसे थे राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अंधेरी सब-वे (subway) जलमयमुक्त करण्यासाठी अंधेरी सब-वे वरूनच उड्डाणपूल उभारणी करण्याचा पर्याय महापालिका पूल विभागाने निवडला होता. पूल उभारणे कितपत शक्य होईल हे तपासणीसाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली.
सब वे वरून पूल होऊ शकतो का, त्याची लांबी किती असावी, त्याचे बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, पुलाचा फायदा, रेल्वे प्रशासनासह विविध परवानगी याचा व्यवहार्यता अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे.
सब वे वरून पुलाची उभारणी केल्यानंतर पुलाचे दोन्ही पोहोच रस्ते उभारताना वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
यासह अन्य तांत्रिक मुद्दे उपस्थित होत असल्याने पूल उभारणी शक्य नाही (impossible), असा अहवाल सल्लागाराने दिल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
त्यामुळे अंधेरी सब-वेची पावसाळ्यातील स्थिती बदलण्याच्या आशा जवळपास संपल्यातच जमा झाल्या आहेत. आता यावर महापालिका काय निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.
हेही वाचा
