Advertisement

राज्यात आणखी २ दिवस पावसाळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता

राज्यात आणखी २ दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

राज्यात आणखी २ दिवस पावसाळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता
SHARES

मुंबईसह राज्यभरातील अनेक किनारपट्टी भागांत पावसानं तडाखा दिला. अचानक आलेल्या पावसानं ठिकठिकाणी काहीसं नुकसान झालं. शिवाय आता पुन्हा एकदा राज्यात आणखी २ दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार बुधवारनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळं राज्यात आणखी २ दिवस पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अवघ्या काही दिवसांमध्ये पाऊस झाल्यानंतर दिवसा तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील गेल्या २४ तासांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता घटणार आहे. त्यानंतर दिवसाच्या तापमानात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवमानात होणारे हे बदल पाहता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे, तर दक्षिणेतडील तामिळनाडू भागातही रविवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. इथं हवामान खात्यानं 'रेड अलर्ट' जारी केल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याचं दिसून येत आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा