मुंबईतील (mumbai) 'द बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी'च्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (shiv sena ubt) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (mns) दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राज ठाकरे (raj thackeray) आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या युतीला एकही जागा मिळाली नाही, तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकून सत्ता मिळवली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच युती म्हणून एकत्र येऊन निवडणूक लढवत होते. त्यामुळे लोकांच्या नजरा या निवडणुकीवर खिळल्या होत्या. ही निवडणूक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची पहिली परीक्षा म्हणून पाहिली जात होती.
'द बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी'च्या निवडणुकीत (election) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुकीत ठाकरे बंधूंचा बेस्ट पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला शून्य जागा मिळाल्या. त्यांच्या उत्कर्ष पॅनलला या निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ठाकरे गट आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांना आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली होती.
पतपेढी निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. पावसामुळे मतमोजणी तीन ते चार तास उशिराने सुरू झाली. या निवडणुकांचे निकाल बुधवारी सकाळी जाहीर झाले.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत (best election) शशांक राव यांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. त्यांच्या पॅनलने 21 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत.
प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. यापैकी 4 भाजपचे, 2 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि एक एससी-एसटी संघाचे उमेदवार विजयी झाले.
हेही वाचा